Monday, July 13, 2026
Home शैक्षणिक बातम्या गणेश कडभने यांच्या वाढदिवशी कडभनवाडी शाळेत स्पोर्ट्स किट वाटप आणि वृक्षारोपण

गणेश कडभने यांच्या वाढदिवशी कडभनवाडी शाळेत स्पोर्ट्स किट वाटप आणि वृक्षारोपण

0
3

जामखेड न्युज – – – – 

गणेश कडभने यांच्या वाढदिवशी कडभनवाडी शाळेत स्पोर्ट्स किट वाटप आणि वृक्षारोपण

 

समाजसेवक गणेश कडभने यांचा वाढदिवस यंदा खास पद्धतीने साजरा झाला. त्यांनी जिल्हा परिषद शाळा कडभनवाडीतील विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स किट आणि उपाहाराचे आयोजन केले.

वाढदिवसाच्या औचित्याने शाळेत वृक्षारोपणही करण्यात आले. “केक कापण्यापेक्षा झाड लावा” हा संदेश यामागे होता.

याप्रसंगी पोलीस पाटील महादेव वराट, उपसरपंच राजुभाऊ वराट, डॉ. लहू जेधे, अभिषेक पाटील, प्रतीक मुरूमकर, नागेश मुरूमकर, सचिन नेमाने, सुशेन कडभने, निलेश नेमाने यांच्यासह गावातील मान्यवर, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश कडभने यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गावकऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!