Friday, August 28, 2026
Home ताज्या बातम्या गणेश मंडळांनो, लक्ष द्या! परवानगीसाठी आता ऑनलाइनच अर्ज, जामखेड पोलिसांचा स्पष्ट आदेश

गणेश मंडळांनो, लक्ष द्या! परवानगीसाठी आता ऑनलाइनच अर्ज, जामखेड पोलिसांचा स्पष्ट आदेश

0
2
गणेश मंडळांनो, लक्ष द्या! परवानगीसाठी आता ऑनलाइनच अर्ज, जामखेड पोलिसांचा स्पष्ट आदेश

जामखेड न्युज – – – – – – 

गणेश मंडळांनो, लक्ष द्या! परवानगीसाठी आता ऑनलाइनच अर्ज, जामखेड पोलिसांचा स्पष्ट आदेश

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश मंडळांसाठी परवानगी प्रक्रियेबाबत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. दि. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव होणार असून, गणेश मंडळांची स्थापना तसेच मिरवणूक व इतर कार्यक्रमांसाठी आवश्यक परवानगी घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

गणेश मंडळे तसेच संबंधित नागरिकांना परवानगीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या Citizen Portal वर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी वेळेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन जामखेड पोलिसांनी केले आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना मंडळाच्या अध्यक्षांनी मंडळाच्या सदस्यांची संपूर्ण माहिती, गणेश मंडळाची स्थापना करण्यात येणारी जागा, विसर्जनाचा मार्ग, मिरवणुकीची तारीख व वेळ तसेच कार्यक्रमासंदर्भातील आवश्यक माहिती सविस्तरपणे नमूद करणे आवश्यक आहे. अर्जातील माहितीची पडताळणी केल्यानंतर नियमानुसार परवानगी देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपातील अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे जामखेड पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी शेवटच्या क्षणाची धावपळ टाळून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परवानगी प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव (गोपनीय शाखा), पोलीस कॉन्स्टेबल योगेश दळवी (कंपनी चालक) आणि पोलीस कॉन्स्टेबल दत्तू बेलेकर (क्राईम) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी ऑनलाइन परवानगी प्रक्रियेची नोंद घेऊन आवश्यक माहिती वेळेत सादर करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 PC प्रकाश जाधव — 8806623459
📞 PC योगेश दळवी — 9356397070
📞 PC दत्तू बेलेकर — 9545585552

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!