स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत चे डि फार्मसी परीक्षेत घवघवीत यश
प्रथम वर्षाचा 100 टक्के तर द्वितीय वर्षाचा 98 टक्के निकाल
जामखेड तालुक्यातील साकत येथील स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसीचे साकतने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाने प्रथम वर्षात शंभर टक्के, तर द्वितीय वर्षात ९८ टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे.
महाविद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयात डी.फार्मसी व बी. फार्मसी अभ्यासक्रमाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.
प्रथम वर्षात भोसले शुभांगी हिने ७३.९० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. आगे मिताली (७३.६० टक्के) द्वितीय, बोडखे अनुष्का (७१.९० टक्के) तृतीय, शेख सिमरन (७१.३० टक्के) चतुर्थ, तर चव्हाण सतीश (७१.१० टक्के) यांनी पाचवा क्रमांक मिळवला.
द्वितीय वर्षात कोठुळे सुशेन यांनी ७८.३६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. निकम सोनाली (७४.७३ टक्के) द्वितीय, सपकाळ सुषमा (७३.०० टक्के) तृतीय, पठाण सलमान (७२.९१ टक्के) चतुर्थ, तर टेकाळे उज्ज्वला (७२.०९ टक्के) यांनी पाचवा क्रमांक पटकावला.
महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळेच हे यश शक्य झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट, सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती तथा विद्यमान संचालक कैलास वराट, प्राचार्य गोरक्ष बारगजे यांच्या सह सर्व संचालक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.