रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीवर प्रा. राजेंद्र कोठारी व विजयसिंह गोलेकर यांची निवड;
शिक्षण वर्तुळात स्वागत
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीवर जामखेडचे नेते राजेंद्र कोठारी व विजयसिंह गोलेकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.शैक्षणिक , सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या उत्तर विभागीय समन्वय समितीच्या सदस्यपदी खर्डा (ता. जामखेड) येथील शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह कल्याणराव गोलेकर व जामखेड येथील ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी दि. ३ जून २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या दि. २५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्र. ८ अन्वये ही निवड करण्यात आली आहे. गोलेकर व कोठारी यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, संस्थेच्या विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून शिक्षणाचा प्रसार करण्याचे महान कार्य पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या विचारांचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याचे कार्य रयत शिक्षण संस्था प्रभावीपणे करत आहे. अशा संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीवर निवड होणे हा जामखेड तालुक्यासाठीही अभिमानाचा विषय मानला जात आहे.
उत्तर विभागाची व्याप्ती: रयतच्या रचनेनुसार अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश उत्तर विभागात होतो. या विभागात संस्थेच्या १४२ शाखा असून सुमारे ९५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
समन्वय समितीची जबाबदारी 1. उत्तर विभागातील सर्व शाखांमधील शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक समन्वय साधणे.
2. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे.
3. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाशी दुवा म्हणून काम करणे.
4. विभागातील गुणवत्ता विकास, शाखा विस्तारीकरण याबाबत शिफारशी करणे. मिळेल” अशी भावना व्यक्त होत आहे.
रयत शिक्षण संस्था – उत्तर विभाग एका दृष्टीक्षेपात: – एकूण शाखा: १४२ – महाविद्यालये: ११ – माध्यमिक शाळा: ९८ – विद्यार्थी संख्या:९५,३२७ – सेवक संख्या: ३,८४०