शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्याशी सविस्तर चर्चा मुख्याध्यापक दत्ता काळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्नेह भोजनाचा घेतला आस्वाद
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्याशी सविस्तर चर्चा
मुख्याध्यापक दत्ता काळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्नेह भोजनाचा घेतला आस्वाद
शिक्षक आमदार श्री. किशोरभाऊ दराडे यांनी जामखेड येथील मुख्याध्यापक दत्ता काळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत आपुलकीच्या वातावरणात विविध शैक्षणिक व संघटनात्मक विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली.
यावेळी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, जुनी पेन्शन योजना, सेवाविषयक अडचणी, शाळांच्या पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण विधिमंडळात सातत्याने आवाज उठवत असून, भविष्यातही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भूमिका शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांचे स्वागत करून जामखेड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांची माहिती दिली. उपस्थितांनीही विविध समस्या व सूचना मांडत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवर, मुख्याध्यापक, संजय वराट, बी. ए. पारखे, दत्ता काळे, दशरथ कोपनर, आप्पा शिरसाट, भरत लहाने, दत्तात्रय राजमाने, सोमनाथ राजुडे, वैभव सांगळे, अशोक आव्हाड सह अनेक मुख्याध्यापक शिक्षक व इतर उपस्थितांनी संवाद साधत शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. सदिच्छा भेटीचे वातावरण अत्यंत आपुलकीचे व सकारात्मक राहिले.