दारूच्या नशेत खोटा काॅल करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या तरूणावर खर्डा पोलीस स्टेशनला खरा गुन्हा दाखल
दारूच्या नशेत आपत्कालीन क्रमांक 112 वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दि. 03/06/2026 रोजी दुपारी 16:37 वा. डायल 112 मो.नं. 9309113159 वरून डाईल 112 ला कॉल प्राप्त झाला. कॉलर सागर श्रीधर ढोले, रा. कुटेवस्ती, वंजारवाडी ता. जामखेड याने “मला काही लोकांनी लोखंडी रॉड, तलवार, चॉपरने मारहाण केली, पोलीस मदत हवी” अशी माहिती दिली.
सदर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. सपोनि उज्वलसिंह राजपूत यांच्या आदेशाने पोकाँ/2492 प्रविण थोरात, पोहेकाँ/295 जी.डी. इंगावले, होमगार्ड आव्हाड, होमगार्ड सागर जायभाय व चापोहेकाँ/बी.एल. पालवे यांचे पथक तात्काळ शासकीय वाहनाने मौजे वंजारवाडी येथे रवाना झाले.
घटनास्थळी गेल्यानंतर सागर श्रीधर ढोले हा घरी दारूच्या नशेत आढळून आला. तो असंबद्ध बडबड करीत होता.व त्याच्या तोंडाचा अंबट उग्र वास येत होता.
सागर ढोले याचे वडील श्रीधर ढोले व आई जयश्राबाई ढोले यांनी सांगितले की, तो नेहमी दारू पिऊन पत्नी, मुले व आई-वडिलांना मारहाण करतो, घरातील सामानाची नासधूस करतो व वारंवार 112 वर “घरच्यांनी/लोकांनी मारहाण केली” अशी खोटी माहिती देतो.
पोलीस आल्यावर फोन बंद करून पळून जातो.अशी माहीती मिळाल्यानंतर सागर ढोले यास सरकारी दवाखाना खर्डा येथील वैद्यकीय तपासणी करुन तो दारूच्या अंमलाखाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला त्या नुसार त्यामुळे त्याने खोटा काँल करुन प्रशासनाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे त्याच्यावरती पोलीस अंमलदार प्रविण थोरात यांनी खर्डा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर – 101/2026 भारतीय न्याय संहिता कलम 212,223,355 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 85 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शासनाने डायल 112 ही आपत्कालीन सुविधा नागरीकांच्या आपत्कालीन परिस्थीतीत मदत पोहचविण्यासाठी सुरु केलेली असतानाही ईसम नाम सागर श्रीधर ढोले रा.कुटेवस्ती,वंजारवाडी ता जामखेड यांने पोलीसांना त्रास व्हावा या उद्देशाने वारंवार सदर सुविधेवर कॉल करुन पोलीसांना खोटी माहिती दिली म्हणुन नमुद ईसमाविरुध्द पोलीस खर्डा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर – 101/2026 भारतीय न्याय संहिता कलम 212,223,355 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 85 (1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का ,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्गे, यांच्या मार्गदशनाखाली खर्डा पोस्टे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत पोलीस अंमलदार, गोकुळ इंगवले, प्रविण थोरात,शशी म्हस्के होमगार्ड आव्हाड, सागर जायभाय यांनी केली व पुढील तपास पोहेकाँ/ गोकुळ इंगवले हे करत आहेत.
चौकट खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांनी नागरीकांना आव्हान करण्यात आले आहे की, डायल 112 ही सुविधा आपत्कालीन सुविधा असुन यावर कॉल करुन खोटी माहिती दिल्यास अथवा विनाकारण वारंवार कॉल केल्यास अशा इसमाविरुध्द कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.