Home ताज्या बातम्या जामखेड साकत रस्त्याची झाली चाळणी, खड्डेच खड्डे यामुळे दररोजच लहान मोठे अपघात...

जामखेड साकत रस्त्याची झाली चाळणी, खड्डेच खड्डे यामुळे दररोजच लहान मोठे अपघात हा रस्ता म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा

0
3

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड साकत रस्त्याची झाली चाळणी, खड्डेच खड्डे यामुळे दररोजच लहान मोठे अपघात

हा रस्ता म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा

 

 

जामखेड साकत रस्ता म्हणजे सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. रस्त्याची चाळणी झाली आहे. वाहने खिळखिळी तर वाहन चालकांचे मनके खिळखिळी झाली आहेत. तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात लहान मोठे अपघात होत आहेत.

ताबडतोब रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी जामखेड न्युजशी बोलताना केली आहे.
जामखेड साकत रस्ता म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाही यातून नेहमीच अपघात होतात. आता तर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. नेहमीच अपघात होत आहेत.

सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची व खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

एका वर्षात साकत घाटात पंधरा ते वीस अपघात झाले आहेत यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. यामुळे ताबडतोब घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे. तसेच सध्या खड्डे भुजवावेत अशी मागणी होत आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आशी मागणी होत आहे.

गेल्या वर्षी ठेकेदाराने काही खड्डे बुजविण्याचे तसेच ठेवले. आता ते खड्डे मोठे झाले आहेत. पावसाळ्यात तर रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहणार नाही त्यामुळे ताबडतोब खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!