Thursday, June 4, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यात पाणी टंचाई, ४ टॅकर सुरू, ७ बोअर-विहिरी अधिग्रहित, प्रशासनाकडून उपाययोजनांना...

जामखेड तालुक्यात पाणी टंचाई, ४ टॅकर सुरू, ७ बोअर-विहिरी अधिग्रहित, प्रशासनाकडून उपाययोजनांना वेग

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड तालुक्यात पाणी टंचाई, ४ टॅकर सुरू, ७ बोअर-विहिरी अधिग्रहित,
प्रशासनाकडून उपाययोजनांना वेग

मान्सून लांबल्याने व भूजल पातळी खालावल्याने जामखेड तालुक्यात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. तालुक्यातील ५८ गावे व अनेक वाड्या – वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले असून प्रशासनाने टंचाई सदृश्य गाव वाडीची पाहणी करून ४ शासकीय टँकर सुरू केले आहेत. तसेच खासगी ७ बोअर व विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी दिली.

पाणी टंचाई प्रस्ताव आलेल्या गाव व वाडी वस्तीवर जाऊन पाहणी करत गरज असेल अशा ठिकाणी ट्रॅकर सुरू केले आहेत. तालुक्यातील नान्नज येथे तीन तर मुंगेवाडी नागोबाचीवाडी येथे एक ट्रॅकर सुरू करण्यात आले आहेत.

पाणी टंचाईचा प्रस्ताव आलेल्या गाव व वाडीवर पंचायत समिती मार्फत जाऊन खरोखर टंचाई आहे का? जलजीवन काम कुठपर्यंत आले आहे काय अडचण आहे किरकोळ खर्च व दुरूस्ती असेल तर ते सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे नंतर विहिर बोअर अधिग्रहण चा विचार व तेही होत नसेल तर टॅकर सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. असे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी सांगितले.

सध्या नान्नज येथे तीन तर मुंगेवाडी नागोबाचीवाडी येथे एक टॅकर सुरू आहेत तर जवळके व खुरदैठण येथील प्रस्ताव आले आहेत. तर पुढील गावात
विहिर व बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे. मोहा 2, दिघोळ 2,
सावरगाव 1, कुसडगाव सरदवाडी 2 तर
नायगाव सतेवाडी चा प्रस्ताव आलेला आहे. सध्या ट्रॅकर सातेफळ मधून भरले जातात.

लोकप्रतिनिधींची मागणी
आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मागणी केली की, “जामखेडसाठी कुकडी डाव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडावे. २०१९ साली मंजूर झालेल्या २७ जलजीवन मिशन योजना पूर्ण झाल्या नाहीत, त्याचा आढावा घ्यावा. टँकर मंजुरीची प्रक्रिया सुलभ करावी.”

 

शेतकरी-नागरिकांचे म्हणणे

टँकर येतो पण ५०० लोकांसाठी १ टाकी. २ हंडे पाणी मिळते. आंघोळ, धुणे, जनावरांचे कसे भागवायचे? अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून आमच्या वाडीला टँकर द्या.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!