जामखेड न्युज – – –
राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, मात्र तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. राज्यात आज दिवसभरात ५ हजार ५५७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर ५ हजार २२५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, आज १५४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
राज्यात करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. असे असले तरी करोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत असल्याने, काहीसं दिलासादायक वातावरण राज्यात आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांचीसंख्या ही कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
राज्यात ५७,५७९ ॲक्टिव्ह रुग्ण
राज्यात आजपर्यंत एकूण ६२,१४,९२१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,११,५७० झाली आहे.