Saturday, May 30, 2026
Home शैक्षणिक बातम्या ल. ना. होशिंगचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांची राज्यस्तरीय ‘योग क्रीडा पंच’ म्हणून...

ल. ना. होशिंगचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांची राज्यस्तरीय ‘योग क्रीडा पंच’ म्हणून निवड जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
5

जामखेड न्युज – – – – – 

ल. ना. होशिंगचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांची राज्यस्तरीय ‘योग क्रीडा पंच’ म्हणून निवड

जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

भारतीय योग महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य योग समितीतर्फे नुकतीच लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत उत्तम कामगिरी करत ल. ना. होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य योगगुरु बाळासाहेब आप्पा पारखे यांची राज्यस्तरीय योग क्रीडा पंच’ म्हणून निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

प्राचार्य बाळासाहेब पारखे यांची महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनमार्फत ‘योग क्रीडा राज्य पंच’ म्हणून निवड झाली आहे. पुणे येथील केब्रीज इंटरनॅशनल स्कूल मधे पार पडलेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षेत लेखी व प्रात्यक्षिक अशा दोन्ही टप्प्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली यामुळे राज्यस्तरीय पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

प्राचार्य बाळासाहेब पारखे यांना
राज्यस्तरीय पंच म्हणून प्रमाणपत्र देताना राजस्थानचे योग गुरू ढोकरामजी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष गवते सचिव पांगरे यांच्या सह अनेक योग तज्ञ शिक्षक उपस्थित होते.

या निवडीबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉक्टर सुनील कटारिया सह सर्व संचालक माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे सह सर्व शिक्षक तसेच नगराध्यक्ष अमित चिंतामणी यांच्या सह मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.

दिनांक 30 मे 2026 रोजी राज्यस्तरीय योग क्रीडा स्पर्धेचे पंच म्हणून निवड झालेली आहे योग पंच परीक्षेत लेखी व प्रात्यक्षिक या दोन्हींमध्ये चांगले गुण प्राप्त झाल्याने राज्यपातळीवर योग स्पर्धेचे पंच म्हणून पारखे साहेबांची निवड झालेली आहे.

बी. ए. पारखे गेल्या पंचवीस वर्षापासून अविरतपणे योगाचे काम सातत्याने करत आहेत. अनेक शाळा महाविद्यालयात त्यांनी योगविद्येच्या प्रचार व प्रसार करत विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले आहे.

प्राचार्य बाळासाहेब पारखे यांची महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनमार्फत ‘योग क्रीडा राज्य पंच’ म्हणून निवड झाली आहे. पुणे येथील केब्रीज इंटरनॅशनल स्कूल मधे
पार पडलेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षेत लेखी व प्रात्यक्षिक अशा दोन्ही टप्प्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

“योग हा आता खेळ प्रकारात समाविष्ट झाला आहे. खेळात पारदर्शकता येण्यासाठी प्रशिक्षित पंचांची गरज आहे. ही जबाबदारी मिळाली याचा आनंद आहे. जामखेडसारख्या ग्रामीण भागातील मुलांना योगासनात करिअर करता यावे यासाठी मी प्रयत्न करणार,” अशी प्रतिक्रिया प्राचार्य पारखे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!