जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच घरमालकाचे मध्यरात्री घरात घुसून त्याचे हात पाय बांधुन व मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी दोन तासातच दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. या प्रकरणी एकुण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फीर्यादी घरमालक कृष्णा अशोक साळुंके वय 23 वर्ष धंदा शिक्षण रा. बीड रोड जामखेड हा दि 19 रोजी रात्री आपल्या घरी झोपला आसताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात दोन व्यक्तींनी वाजवला या वेळी दिड वर्षा पासुन फीर्यादी च्या घरातील रुम मधे भाड्याने राहणार्या आरोपी योगेश शहादेव शिंदे याने गेटचा दरवाजा उघडला या नंतर दोन आरोपींनी माझ्या घरात येऊन माझे हात पाय बांधुन, तोंडाला रूमाल बांधुन व गळ्याला चाकु लावून एम एच 12 एफ के – 3897 या चारचाकी वाहणात मागच्या सिटवर बसवुन म्हणाले की कृष्णा याने दहा लाख रूपये दिले नाही तर त्यास ठार मारून टाकू. हे सर्व फीर्यादी कृष्णा याने गाडीत ऐकले होते. या नंतर फीर्यादी याने कसेतरी गाडीतुन आपली सुटका करुन घेतली व बीड रोडवरील आपल्या घराजवळ आरडाओरड केली. मात्र तरी देखील भाड्याने राहत आसलेल्या आरोपी योगेश शिंदे यांने फीर्यादी घरमालकास दम दिला की तु गाडीत येऊन बस नाहीतर तुझ्या आईला ठार मारु. या नंतर शेजारी रहाणारे लोक धावत बाहेर आले त्या मुळे आरोपी योगेश शिंदे रा सौताडा ता. पाटोदा जिल्हा बीड व त्याचे दोन साथीदार घटनास्थळाहुन पळुन गेले. या प्रकरणी फिर्यादी कृष्णा साळुंके याने दिलेल्या फिर्यादीवरून एकुण तीन आरोपींविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना लपुन बसलेल्या नागेश शाळेच्या पाठीमागील भागातील एका घरातुन अटक केली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपविभागीय अधिकारी
अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, अरुण पवार, संदीप राऊत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे, विजय कोळी चालक हनुमान आरसुल, महिला पोलीस मनीषा दहिरे यांनी केली आहे.