Friday, May 22, 2026
Home ताज्या बातम्या पेट्रोल – डिझेल टंचाई व दरवाढीमुळे शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांना महागाईचा फटका

पेट्रोल – डिझेल टंचाई व दरवाढीमुळे शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांना महागाईचा फटका

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

पेट्रोल – डिझेल टंचाई व दरवाढीमुळे शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांना महागाईचा फटका

मान्सून पुर्व मशागतीची कामे जोमात असताना अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे तसेच दरवाढीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या आठवड्यापासून अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर, जेसीबी आणि मालवाहतूक ठप्प झाली आहे. तसेच जेसीबी चा हजार रुपये ऐवजी 1200 रूपये तास झाला आहे. दरवाढीचा फटका शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. सगळेच भाव वाढू लागले आहेत.

शेतकऱ्यांसमोरची आव्हाने

डिझेलअभावी हार्वेस्टर आणि ट्रॅक्टर बंद पडले आहेत. सध्या पेरणीयोग्य जमीन तयार करण्यासाठी मशागतीची कामे रखडली आहेत. नांगरणी, मोगडा, पाळी कामे रखडली आहेत. ट्रॅक्टर, जेसीबी पंपावर आणणे शक्य नाही. ड्र्म मध्ये मिळत नाही. तालुक्यात कोठेतरी एखाद्या पंपावर पेट्रोल डिझेल आहे अशी बातमी मिळाली की शेतकरी तेथे जातात तोपर्यंत संपलेले असते सध्या शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातच भाववाढीने डोके वर काढले आहे.

वाहतूक महागली
ज्या पंपावर डिझेल मिळते तिथे ५ ते ६ तास रांगेत उभे राहावे लागते. काळ्या बाजारात डिझेल १२५ ते १३५ रुपये लिटरने विकले जात आहे. त्यामुळे बाजार समितीपर्यंत माल नेण्याचा खर्च दुप्पट झाला. ट्रॅक्टर, जेसीबी दरवाढ झाली आहे.

आगोदरच टंचाई यात पुन्हा दरवाढ यामुळे सर्वच ठिकाणी महागाई वाढू लागली आहे. भाडेवाढ होत आहे याचा फटका सर्व सामान्यांना व शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, पुणे आणि मनमाड येथील इंधन डेपो निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना इंधनाचा अविरत पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

इंधन वाटपावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पेट्रोल पंप परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांना सुरळीत सेवा मिळणे आवश्यक असून पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. पुरवठा साखळी सक्षम ठेवणे तसेच नागरिकांना वेळेत इंधन उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्यावर भर देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल साठा, पुरवठा व्यवस्था, वाहतूक समन्वय तसेच विविध तालुक्यांतील इंधन उपलब्धतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!