जामखेड न्युज – – – – –
जामखेडच्या दोन तरूणांचा रस्ता अपघातात जागीच मृत्यू
माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात
माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील अँड. विराज भगवान जायभाय (वय अंदाजे २५) व सोनू डुचे (वय अंदाजे २४) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ अँड. भगवान जायभाय यांचे सुपुत्र अँड. विराज जायभाय हे पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते.

मोठ्या भावाच्या विवाहासाठी ते जामखेड येथे आले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर दि. ११ रोजी रात्री विराज जायभाय, सोनू डुचे व पुणे येथील एक मित्र असे तिघेजण पुण्याकडे निघाले होते.

ते (एमएच १७ एझेड ३२४२) क्रमांकाच्या आय-२० कारमधून प्रवास करत असताना माहिजळगाव जवळील आंबिलवाडी परिसरातील वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने भरधाव कार रस्ता सोडून शेतात घुसली.

त्यानंतर वाहनाने अनेक पलट्या घेत उलटून भीषण अपघात झाला.अपघात इतका गंभीर होता की अँड. विराज जायभाय व सोनू डुचे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला पुणे येथील मित्र गंभीर जखमी झाला आहे.





