Sunday, May 10, 2026
Home शैक्षणिक बातम्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाचे एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाचे एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

0
2

जामखेड न्युज – – – – – 

खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाचे एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

 


फेब्रुवारी /मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एस. एस.सी. बोर्ड परीक्षेत खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाचा 92.30%निकाल लागला असून 273पैकी 252 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणीत 88 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे तर प्रथम श्रेणीत 90 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक- येवले राजयोग धनंजय -96.40%, द्वितीय क्रमांक-कु. केकान स्नेहल नाना-95.80% आणि तृतीय क्रमांक-ढाळे ऋतुजा सखाराम-95.40% हिने मिळवला आहे.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक श्री. संदीप टेकाळे श्रीम. अभिलाषा वांढरे,श्रीम विशाखा ससाणे ,श्री.दादासाहेब पारखे, श्री.तुकाराम विधाते श्री.देवगुणे संतोष, श्री.गणेश शिंदे,श्रीम. प्रियाली भुडे,श्री. संदीप राऊत, श्री. विनायक पवार या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


विद्यालयास मिळालेल्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य मा. आ. रोहित दादा पवार ,मा. विजयसिंह गोलेकर (सल्लागार समिती सदस्य,रयत शिक्षण संस्था उत्तरविभाग, अहिल्यानगर ),

मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण गदादे ,स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा अँड. जयश्रीताई गोलेकर सदस्य श्री. किशोरशेठ कांकरिया , श्री अशोक गिते , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सचिन लोळगे व सर्व सदस्य, सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!