Home ताज्या बातम्या नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारी चिंगळ्या पकडल्या आता शार्क माशावर कारवाई कधी – आमदार रोहित...

नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारी चिंगळ्या पकडल्या आता शार्क माशावर कारवाई कधी – आमदार रोहित पवार शार्क माशाला कोणाचे अभय?

0
15

जामखेड न्युज – – – – – 

  • नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारी चिंगळ्या  पकडल्या आता शार्क माशावर कारवाई कधी – आमदार रोहित पवार

शार्क माशाला कोणाचे अभय?

 

भाजपाच्या ताब्यात असलेल्या जामखेड नगरपरिषेतील भ्रष्ट कारभाराचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज जाहीर पंचनामा केला. जन्म दाखला देण्यासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपीक आणि मदतनीस अशा दोघांवर कारवाई केली, पण हे दोघेही केवळ छोट्या छोट्या चिंगळ्या आहेत.

नगरपरिषद प्रशासनातील भ्रष्टाचारातला सर्वांत मोठा शार्क मासा सर्वांना माहित असून तो मात्र यातून अद्याप नामानिराळा आहे.. आधी भ्रष्टाचाराच्या पाण्यात पोहणाऱ्या या शार्क माशाला कारवाईच्या जाळ्यात अडकवून पाण्याबाहेर काढण्याची गरज आहे. असं केलं तरच बाकीच्या चिंगळ्याही नीट काम करतील आणि जामखेडकरांची भ्रष्ट कारभाराच्या त्रासातून सुटका होईल.

विशेष म्हणजे याच शार्क माशाला मुदतवाढ देण्याचा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न असून तो यशस्वी होऊ न देता हाणून पाडला जाईल अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकांउट वर केली आहे.

जामखेड नगरपरिषदकडून मुलगा व मुलगी जन्म दाखला घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडून नोव्हेंबर 2025 मध्ये अर्जाद्वारे मागणी केली होती. तेव्हा दोन्ही दाखल्याचे तीन हजार रुपये द्या अशी मागणी केली होती. आज 6 मे रोजी जन्मदाखले देताना तीन हजार रुपयांची लाच घेताना जामखेड नगरपरिषदेचे दोन कर्मचारी रंगेहाथ पकडले यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये जामखेड नगरपरिषदेकडे अर्जाद्वारे मुलगा व मुलगी यांच्या जन्म दाखल्याची योग्य कागदपत्रे जोडून मागणी केली होती मात्र एका दाखल्याचे 1500 रूपये असे दोन दाखल्याचे तीन हजार रुपयांची लाच घेताना नगरपरिषद कर्मचारी आरोपी १) अभिजीत जालिम भैसडे, वय-३९ वर्षे, पद- लिपिक, जन्म मृत्यु नोंदणीविभाग, नगरपरिषद जामखेड, रा. तपनेश्वर गल्ली, मारूती मंदिरासमोर, जामखेड, ता.जामखेड, जि. अहिल्यानगर

२) अहमद इलियास शेख, वय – ४३ वर्षे, पद- मदतनीस, अग्निशामक दल, नगरपरिषद जामखेड, (कंत्राटी ), रा. काझी गल्ली, मश्जिद समोर, खर्डारोड,| जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर. यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर २) पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधिक्षक अजित त्रिपुटे, सापळा पथक :- १) पोना चंद्रकांत भिमसेन काळे २) पो कॉ किशोर विठठल कुळधर ३)पोकॉ शेखर बाळासाहेब वाघ ४) चालक पोहेकॉ दशरथ भिमराव लाड सर्व नेम- ला.प्र.वि.अहिल्यानगर

वरील प्रकरणाचा तपास पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटी हे करत आहेत.

वरील कारवाई भारत तांगडे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!