Wednesday, May 6, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड नगरपरिषदेचे दोन कर्मचारी तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले, जामखेड तालुक्यात...

जामखेड नगरपरिषदेचे दोन कर्मचारी तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले, जामखेड तालुक्यात एकच खळबळ

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड नगरपरिषदेचे दोन कर्मचारी तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले, जामखेड तालुक्यात एकच खळबळ

जामखेड नगरपरिषदकडून मुलगा व मुलगी जन्म दाखला घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडून नोव्हेंबर 2025 मध्ये अर्जाद्वारे मागणी केली होती. तेव्हा दोन्ही दाखल्याचे तीन हजार रुपये द्या अशी मागणी केली होती. आज 6 मे रोजी जन्मदाखले देताना तीन हजार रुपयांची लाच घेताना जामखेड नगरपरिषदेचे दोन कर्मचारी रंगेहाथ पकडले यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये जामखेड नगरपरिषदेकडे अर्जाद्वारे मुलगा व मुलगी यांच्या जन्म दाखल्याची योग्य कागदपत्रे जोडून मागणी केली होती मात्र एका दाखल्याचे 1500 रूपये असे दोन दाखल्याचे तीन हजार रुपयांची लाच घेताना नगरपरिषद कर्मचारी आरोपी १) अभिजीत जालिम भैसडे, वय-३९ वर्षे, पद- लिपिक, जन्म मृत्यु नोंदणीविभाग, नगरपरिषद जामखेड, रा. तपनेश्वर गल्ली, मारूती मंदिरासमोर, जामखेड, ता.जामखेड, जि. अहिल्यानगर

२) अहमद इलियास शेख, वय – ४३ वर्षे, पद- मदतनीस, अग्निशामक दल, नगरपरिषद जामखेड, (कंत्राटी ), रा. काझी गल्ली, मश्जिद समोर, खर्डारोड,| जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर. यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी दिनांक २६/११/२०२५ रोजी जामखेड नगरपरिषद, जामखेड येथे त्यांचा मुलगा व मुलगी यांचे जन्म दाखला मिळणे करीता आवश्यक कागदपत्र जोडुन अर्ज दिला होता व मुलांचा जन्म दाखला मिळणे कामी त्यांनी लोकसेवक भैसडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी लोकसेवक भैसडे यांनी लोकसेवक शेख यांना संपर्क करण्यास सांगितले असता त्याप्रमाणे तक्रारदार यांनी लोकसेवक भैसडे यांचे सांगणेवरून लोकसेवक शेख यांना संपर्क केला असता लोकसेवक शेख हे तक्रारदार यांचेकडे दोन्ही मुलांचा जन्मदाखला देण्याकरीता लोकसेवक भैसडे यांचेकरीता प्रत्येक दाखल्याचे १५००/- रूपये याप्रमाणे दोन जन्म| दाखल्यांचे ३,००० /- रूपये लाचेची मागणी करत असल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अ. नगर कार्यालयात दिनांक ०५/०५/२०२६ रोजी प्राप्त झाली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीप्रमाणे दिनांक ०६/०५/२०२६ रोजी लाच मागणी पडताळणी वेळी तक्रारदार यांनी लोकसेवक अभिजीत भैसडे यांची नगरपरिषद जामखेड येथे भेट घेतली असता लोकसेवक भैसडे यांनी तक्रारदार यांना लोकसेवक शेख यांची भेट घेण्यास सांगितले असता लोकसेवक भैसडे यांचे सांगणे प्रमाणे तक्रारदार यांनी लोकसेवक शेख यांची भेट घेतली असता लोकसेवक शेख यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे मुलाचा व मुलीचा जन्म दाखला देण्या करीता लोकसेवक भैसडे यांचेसाठी प्रति जन्म दाखल १,५००/- रूपये याप्रमाणे दोन जन्म दाखल्यांचे ३,००० /- रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची संमती दर्शवली व दिनांक ०६/०५/२०२६ रोजी यशस्वी सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक शेख यांनी जामखेड नगपरिषद समोर तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष ३,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारली असुन लोकसेवक शेख यांनी तक्रारदार यांचेकडुन स्विकारलेल्या लाच रक्कमेस लोकसेवक भैसडे यांनी समती दर्शवुन लाच स्विकारण्यास प्रोत्साहन दिलेले आहे.

सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर २) पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधिक्षक अजित त्रिपुटे,
सापळा पथक :- १) पोना चंद्रकांत भिमसेन काळे २) पो कॉ किशोर विठठल कुळधर ३)पोकॉ शेखर बाळासाहेब वाघ ४) चालक पोहेकॉ दशरथ भिमराव लाड सर्व नेम- ला.प्र.वि.अहिल्यानगर

वरील प्रकरणाचा तपास पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटी हे करत आहेत.

वरील कारवाई भारत तांगडे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क करावा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टि.व्ही सेंटर समोर,सावेडी, अहिल्यानगर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!