जामखेड न्युज—–
शेकडो सैनिक घडविणारी शिवनेरी अकॅडमी
बाराव्या वर्धापनदिनानिमित्त अकॅडमीविषयी खास लेख

भारतीय सैन्यदलात, पोलीस दलात, जाण्यासाठी जे तरूण भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी जामखेड येथील शिवनेरी करीअर अकॅडमी येथे प्रशिक्षण घेणे हा एक उत्तम पर्याय असून या ठिकाणाहून आतापर्यंत बारा वर्षात सुमारे २५१ पेक्षा अधिक मुलं-मुली विविध ठिकाणी भरती झाले आहेत.
आम्ही सैनिक घडवतो अशी शिवनेरी अकॅडमी आपल्या जामखेड पंचक्रोशी मध्ये 01 जून 2014 पासून कार्यरत आहे. येणाऱ्या 01 जून 2026 ला अकॅडमीस बारा वर्षे पूर्ण होत आहेत. आत्तापर्यंत आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस आर्मी व इतर सर्व दलात 235 विद्यार्थी व सोळा विद्यार्थिनी म्हणजेच 251 परिवार येथून घडलेले आहेत.

शिवनेरी अकॅडमी गरजू व गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला येते फसवले जात नाही या संकुलातून एक आदर्श व व्यसनमुक्त देशभक्तच घडवला जातो हे नक्कीच आहे आणि म्हणून अशा या अकॅडमीसाठी वॉलेंटर आणि इच्छुक दोन तरुण आणि तडफदार शिक्षकांची जरुरत आहे.

वॉलेंटर शिक्षकास योग्य ते पेमेंट दिले जाईल किंवा विद्यार्थ्यानुसार पार्टनरशिप मध्ये सुद्धा घेतले जाईल नक्कीच एक वेळा अकॅडमी साठी संपर्क करा व नक्कीच आपल्या हातून देशासाठी वर्दीधारी बनवा.

शिवनेरी अकॅडमी जामखेडचे संचालक कॅप्टन लक्ष्मणराव भोरे (से. नि.) यांनी अग्निवीर भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना
आवाहन केले आहे की, अग्निवीर भरतीसाठी तयारी करणाऱ्या बहादूर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मागील बारा वर्षापासून येथे २५१ विद्यार्थी भरती झाले आहेत. तेव्हा इच्छुकांनी आजच अकॅडमीत प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आता येणाऱ्या अग्नीविर भरतीमध्ये अगोदर लेखी परीक्षा (CEE) झालेली असून त्यातून जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचेच फिजिकल व मेडिकल होईल तरीही संधी न डावलता वेळ आणखीन गेलेली नाही तरी सर्व
तरुण तडफदार विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात येते की आपण पूर्ण तयारीला लागून “जिद्द चिकाटी सातत्य व संयम बाळगल्यानंतर नक्कीच यश मिळते” तरी आपण सर्वांनी हार न मानता जोमाने व जिद्दीने परत तयारी करावी यश नक्कीच तुमच्या पायथ्याशी आहे.
“दशा बदलायची असेल तर दिशा बदला.
नक्कीच शिवनेरी अकॅडमी एक वेळा अवश्य भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करा….
शिवनेरी अकॅडमीचे वैशिष्ट्ये
सर्वच दलाकरिता योग्य मार्गदर्शन..
तज्ञ वा अनुभवी शिक्षक भरती क्षेत्रातील आठ वर्षांचा अनुभव….
प्रत्येक शनिवारी शारीरिक व लेखी परीक्षा पूर्ण तयारी
निवास व भोजनाची उत्तम सोय व मिनरल वॉटर सुविधा
माजी सैनिक व एनसीसी विद्यार्थ्यांना विशेष सवलत
व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर व वैयक्तिक लक्ष.
कॅप्टन लक्ष्मण भोरे (से. नि.) संचालक शिवनेरी अकॅडमी जामखेड मो. नं. 9158006663 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












