Wednesday, April 22, 2026
Home ताज्या बातम्या नगरी पोलीस अधिकाऱ्याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ ची परेड महेश जंजिरे यांनी...

नगरी पोलीस अधिकाऱ्याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ ची परेड महेश जंजिरे यांनी दिल्लीच्या गुरुग्राममध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसमोर केले शानदार संचलन..।

0
2

जामखेड न्युज—–

नगरी पोलीस अधिकाऱ्याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ ची परेड

महेश जंजिरे यांनी दिल्लीच्या गुरुग्राममध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसमोर केले शानदार संचलन..।

नवी दिल्ली येथील गुरुग्राम मधील केंद्रीय राखीव पोलीस दल अकादमीत ‘सीआरपीएफ’ मधील असिस्टंट कमांडंट या पदाचे एक वर्षाचे अत्यंत खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४६ अधिका-यांना आज ( ता. २२) रोजी दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ देण्यात आली. यावेळी झालेल्या पासिॅग आऊट परेडमध्ये श्रीगोंदा येथील महेश जंजिरे यांनी शानदार संचालन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांच्यासह ‘सीआरपीएफ’ चे विशेष महानिरीक्षक जकी अहमद, अकादमीचे संचालक अमित कुमार यांच्यासह ‘सीआरपीएफ’ चे अधिकारी, महेश शिंदे यांच्यासह प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४६ असिस्टंट कमांडंट अधिकाऱ्यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.

अहिल्यानगर येथील महेश जंजिरे यांनी एक वर्षाच्या कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणानंतर असिस्टंट कमांडंट म्हणून उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले.
त्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

महेश जंजिरे यांच्या या यशामुळे अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाने यूपीएससी परीक्षांची तयारी करणा-या तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

या दीक्षांत समारंभासाठी महेश जंजिरे यांचे वडील ईश्वर जंजिरे, आई सुनीता जंजिरे, पत्नी वास्तुविशारद काजल दरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील दरेकर, अश्विनी दरेकर, ॲड. सविता बोठेपाटील यांच्यासह अहिल्यानगर व श्रीगोंदा येथील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

चौकट
—————
युपीएससी परीक्षेत मराठी तरुणांचा टक्का वाढण्यासाठी मदतीची तयारी : महेश जंजिरे

महेश जंजिरे यांनी यावेळी सांगितले की, युपीएससीमध्ये मराठी टक्का वाढायला हवा. मराठी मुलांमध्ये युपीएससी परीक्षेबाबतची विनाकारण असलेली भीती व न्यूनगंड दूर करुन त्यांच्यात अभ्यासाची जिद्द व प्रशासनात अधिकारी होण्याची उर्मी निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी तसेच शिस्तबद्ध अभ्यासासाठी महाराष्ट्रातील इच्छुक तरुणांना मदत करण्याची आपली तयारी आहे, असे महेश जंजिरे यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे दीक्षांत समारंभाला उपस्थित मराठी मंडळींनी जोरदार स्वागत करुन त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!