Sunday, June 21, 2026
Home ताज्या बातम्या अहिल्यानगरमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार

अहिल्यानगरमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार

0
36

जामखेड न्युज—–

अहिल्यानगरमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार

 

जामखेड येथील शुभम अरुण हंबीरराव याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शुभमचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण कोरघंटीवार, संत सखुबाई शासकीय मुलींचे वस्तीगृहाच्या डॉ. दवणे मॅडम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृहाचे डॉ. संदीप इंगळे सर, तसेच CSRD कॉलेजचे संचालक डॉ. सुरेश मुकुटमल सर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुभम सध्या CSRD ISWR, अहिल्यानगर या महाविद्यालयात एमएसडब्ल्यू (द्वितीय वर्ष) या वर्गात शिक्षण घेत असून तो समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृह, अहिल्यानगर येथे वास्तव्यास आहे.

शुभमच्या या यशाबद्दल सर्व मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!