केरळमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय कलारीपट्टू स्पर्धेत रोहित थोरात ला रौप्य पदक
केरळ येथे दि. 27 ते 30 मार्च दरम्यान पार पडलेल्या कलारीपट्टू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या रोहित शिवाजी थोरात यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.
65 किलोच्या आतील गटामध्ये खेळताना रोहित थोरात यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात त्यांची लढत केरळच्या खेळाडूसोबत झाली.
अत्यंत चुरशीच्या या सामन्यात केरळच्या खेळाडूने 3 गुण मिळवले, तर रोहित थोरात यांनी 2 गुण मिळवत दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
रोहित थोरात हे वंजारवाडी (तरडगाव), तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून त्यांनी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, जामखेड येथे प्रशिक्षण घेतले आहे.
या यशाबद्दल मराठी कलारिप्पायडू असोसिएशनचे सचिव निलेश वाळिंबे तसेच प्रशिक्षक श्याम पंडित यांनी रोहित थोरात यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व सीनियर खेळाडूंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.