Home शैक्षणिक बातम्या शेतकरी कन्या चंदना विक्रम उगले हिची अहिल्यानगर पोलीस पदी निवड ओबीसी...

शेतकरी कन्या चंदना विक्रम उगले हिची अहिल्यानगर पोलीस पदी निवड ओबीसी प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम

0
4

जामखेड न्युज—–

शेतकरी कन्या चंदना विक्रम उगले हिची अहिल्यानगर पोलीस पदी निवड

ओबीसी प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी विक्रम विठ्ठल उगले यांची कन्या चंदना विक्रम उगले हीची अहिल्यानगर जिल्हा पोलीस पदी निवड झाली आहे. तीने ओबीसी प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला तिच्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चंदना विक्रम उगले हिचे पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव तसेच पाचवी ते दहावी पंचक्रोशी विद्यालय नायगाव येथे झाले अकरावी बारावी ल. ना.होशिंग ज्युनियर काॅलेज जामखेड येथे झाले. सध्या ती बीएस्सी जामखेड महाविद्यालय जामखेड येथे शिक्षण घेत आहे. शेवटच्या वर्गात शिक्षण घेत होती.

धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील कर्मवीर भरती पुर्व प्रशिक्षण संस्थेत सराव करत होती तिच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. तिने शारीरिक क्षमता परिक्षेत 50 पैकी 39 गुण घेतले तर लेखी परीक्षेत शंभर पैकी 82 गुण घेतले अशा प्रकारे 150 पैकी 121 गुण घेत ओबीसी प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

नायगाव येथील शेतकरी विक्रम विठ्ठल उगले यांची कन्या कु. चंदना विक्रम उगले आहिल्यानगर पोलीस, पदी निवड झाल्याबद्दल तिचा व आई वडिलांचा सन्मान करण्यात आला व तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

तिचा सन्मान करताना शिवसेना विधानसभा प्रमुख गणेश उगले, पोलीस पाटील संतोष उगले, शिवसेना विभाग प्रमुख संतोष शिंदे, कांतीलाल उगले, सुशील काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

चंदना विक्रम उगले हिच्या यशाबद्दल युवराज उगले, बाबू उगले, परमेश्वर उगले, नितीन ससाणे, आश्रू उगले सह अनेक ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!