भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहर व परिसरात शांतता, सुव्यवस्था आणि उत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन सुनिश्चित करण्यासाठी दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजता जामखेड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
पोलीस उपविभागीय अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांनी सूचना देत सांगितले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करावी तसेच यासाठी प्रशासनाचा समन्वय महत्त्वाचा आहे.जयंती उत्सवादरम्यान मिरवणुका काढण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सांगत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे, मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करावेत, विजेचे लोंबकळणारे तारा व पोल दुरुस्त करावेत तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकच स्वागत कक्ष उभारावा, अशा सूचना दिल्या.
तहसीलदार धनंजय बांगर यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे, मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच वेळेचे नियोजन पाळावे, असे आवाहन केले.
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जयंती उत्सवानिमित्त फ्लेक्स बोर्ड लावताना नगरपरिषदेची परवानगी घेणे आवश्यक असून डीजे बंदीचे पालन करावे व कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या.
यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात,ॲड. डॉ. अरुण जाधव, प्रा. कैलास माने, प्रा. विकी घायतडक,संध्या सोनवणे,विकी सदाफुले, प्रा.सुनील जावळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस पोलीस उपविभागीय अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, तहसीलदार धनंजय बांगर, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, महावितरणचे उपअभियंता प्रदीप कटकधोंड तसेच जामखेड नगर परिषदेचे अभियंता अमर शेख उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात,वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, नगरसेवक प्रा. विकी घायतडक, नगरसेवक श्रीराम डोके, पवन राळेभात, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक नेत्या संध्या सोनवणे, प्रा. सुनील जावळे,ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, युवा नेते प्रवीण होळकर, राणा सदाफुले, आतिश पारवे, सुमित भालेराव, प्रितम घायतडक, सुशिल राजगुरु, किशोर कांबळे, विकी कांबळे, अंकल घायतडक, अभि सदाफुले आदी शांतता कमिटी सदस्य, राजकीय, सामाजिक, संघटना पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, मिरवणूक मंडळ अध्यक्ष यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव यांनी नियोजन केले होते.
चौकट
मिरवणुका काढण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक आहे. ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे. डी.जे. वापरण्यास बंदी आहे. फ्लेक्स/बॅनर लावताना नगरपरिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवावी. रस्त्यावर अडथळे निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विजेचे तारा, पोल यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. पार्किंगची योग्य व्यवस्था करावी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकच स्वागत कक्ष उभारावा. कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे.