Friday, April 3, 2026
Home ताज्या बातम्या राज रिसाॅर्ट लक्झुरीयम लाॅन्समुळे जामखेडच्या वैभवात भर – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी ...

राज रिसाॅर्ट लक्झुरीयम लाॅन्समुळे जामखेडच्या वैभवात भर – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी जामखेड करांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी कटिबद्ध – युवराज पोकळे अहिल्यानगर, पुणे येथील सुविधा जामखेड शहरात

0
2

जामखेड न्युज—–

राज रिसाॅर्ट लक्झुरीयम लाॅन्समुळे जामखेडच्या वैभवात भर – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

जामखेड करांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी कटिबद्ध – युवराज पोकळे

अहिल्यानगर, पुणे येथील सुविधा जामखेड शहरात

जामखेड शहरातील युवा उद्योजक युवराज पोकळे यांनी शुन्यातून विश्व निर्माण करून व्यवसाय क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.त्यांनी परिसरातील नागरिकांची गरज ओळखून भव्य दिव्य सुविधा युक्त
राज रिसाॅर्ट लक्झुरीयम लाॅज पार्टी लाॅन्स जामखेड करांच्या सेवेत सुरु केले असून नागरीकांना आता अहिल्यानगर पुणे येथे जाण्याची आवश्यकता नसून पुणे अहिल्यानगर येथील नागरीकांना जामखेड शहरात राज रिसाॅर्ट लक्झुरीयम लाॅज पार्टी लाॅन्समुळे सुविधा मिळणार असून या नुतन रिसाॅर्ट लक्झुरीयम लाॅज पार्टी मुळे जामखेड शहराच्या वैभवात भर पडली असून युवराज भाऊ लवकरच यशाच शिखर गाठतील असे गौरवोद्गार नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी उद्घाटनप्रसंगी काढले राज सॉर्ट & लक्झुरियम लॉज पार्टी लॉन्स या अत्याधुनिक व आकर्षक सुविधांनी सुसज्ज वास्तूचे भव्य उद्घाटन दि. ३१ मार्च रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

उद्घाटन सोहळ्याला परिसरातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, व्यापारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रीमती.आशाबाई रामचंद्र पोकळे आईसाहेब यांच्या हस्ते फित कापून व पूजन करून या नवीन वास्तूचे लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की,राज रिसॉर्ट & लक्झुरियम लॉज पार्टी लॉन्स हे केवळ एक लॉज किंवा पार्टी लॉन नसून, विविध लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुडा, कौटुंबिक कार्यक्रम, सामाजिक समारंभ व कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठी अत्यंत उपयुक्त असे आधुनिक ठिकाण ठरणार आहे.या वास्तूमध्ये प्रशस्त पार्टी लॉन, आकर्षक सजावट, निवासासाठी आरामदायी खोल्या, वाहन पार्किंग, उत्कृष्ट सेवा सुविधा आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार असल्याने आता महाबळेश्वर,अहिल्यानगर,पुणे येथील सुविधा जामखेड शहरात युवराज पोकळे यांनी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणाला मोठी पसंती मिळणार आहे.असे मत संजय काका काशिद,अमित चिंतामणी, आकाश बाफना, राजेंद्र कोठारी,सचिन सानप, मनोज कुलकर्णी,पवन राळेभात,कैलास माने, हजारे ,संजय कोठारी,पांडुराजे भोसले आदी मान्यवरांनी उपस्थित राहून व्यक्त करत युवराज पोकळे यांच्या कर्तृत्वाचा आलेख इतरांसाठी प्रेरणादायी प्रवासाचा लोखाजोखा समोर मांडला उद्घाटनानिमित्त संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि स्वागत कमानींनी उजळून निघाला होता. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व पाहुण्यांसाठी स्वादिष्ट भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी सचिन देशमुख,आ.रोहित दादा पवार यांचे स्वीय सहाय्यक मोकासे, अभिजित सर,विनय सर,राम शेठ राळेभात, तात्याराम पोकळे,युवा नेते प्रविण दादा उगले,प्रा.संभाजी शेटे,राहुल न-हे,खंडू सगळे,पांडू सगळे, बाळासाहेब डुचे, पोकळे परिवार परिसरात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

राज रिसॉर्ट & लक्झुरियम लॉज पार्टी लॉन्स सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना आता समारंभांसाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नसून, स्थानिक स्तरावरच दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

चौकट

पत्र्याच्या शेडपासून सुरु झालेल्या राज उद्योग समुहाची गगनभरारी

वयाच्या १६ व्या वर्षापासून युवराज पोकळे यांनी छोट्याशा पत्र्याच्या हाॅटेलपासून व्यवसाय सुरू केला आजतगायत राज काॅम्प्लेक्स,राज लाॅन्स & मंगल कार्यालय,राज बिअर शाॅपी,राज रिसॉर्ट लक्झुरियम लॉज पार्टी लॉन्स व्यवसायात अल्पवधीतच गगनभरारी घेतली असून जिद्द चिकाटी च्या जोरावर नावलौकिक मिळविला असून दर्जेदार सुविधा दिल्याने कार्यक्रम म्हटले की लोक पहिल्यांदा राज उद्योगाला भेट देतात सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या असून भविष्यात जामखेड करांच्या सेवेसाठी मान्यवरांनी राज पॅलेसची उभारणी करण्याची मागणी करताच जामखेड करांच्या इच्छेसाठी कटीबद्ध असून लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण करु असा विश्वास देत जामखेड करांनी दाखवलेल्या प्रेमाने आभार व्यक्त करताना प्रो.प्रा.युवराज पोकळे यांना गहिवरून आले उपस्थित फक्त फोनवर उपस्थित झाले विनंती ला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.जामखेड करांचे व मित्र परिवाराच्या प्रेमाने व सहकार्याने व्यवसायात भरारी
घेऊ शकलो असे मत आभार व्यक्त करताना पोकळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!