Tuesday, March 17, 2026
Home ताज्या बातम्या एपस्टिंग फाईल मधील नरेंद्र मोदी,ड्रोनाल्ड ट्रम्प यांचे नाव झाकण्यासाठी युद्ध, गॅस तुटवडा...

एपस्टिंग फाईल मधील नरेंद्र मोदी,ड्रोनाल्ड ट्रम्प यांचे नाव झाकण्यासाठी युद्ध, गॅस तुटवडा -अँड डॉ अरुण जाधव

0
4

जामखेड न्युज—–

एपस्टिंग फाईल मधील नरेंद्र मोदी,ड्रोनाल्ड ट्रम्प यांचे नाव झाकण्यासाठी युद्ध, गॅस तुटवडा -अँड डॉ अरुण जाधव

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ता अँड डॉ अरुणआबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये घरगुती गॅस सिलेंडर तुटवडा आणि महागाई विरोधात कर्जत तहसील कार्यालयासमोर जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात आले. 

गॅस तुटवडा आणि पेट्रोल डिझेल गॅस महागाईचे कारण जेफ्री इपेस्टिंग नावाच्या राक्षसाने बेटावर स्वतःचे क्रूर कृत्य करण्यासाठी बेटावर एक स्वतःचे राजेशाही थाटातील महल बांधून , अल्पवयीन मुली आणि मुलं यांना नोकरीच्या भरती दाखवून बोलवलं जाते.

जेफ्री टेस्टिंगच्या राक्षसी कृत्या मध्ये जाळ्यात अडकवले जाते आणि जगातील अनेक सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती ,राष्ट्राध्यक्ष, अनेक उद्योगपती यांना मेजवानी म्हणून बोलावले जाते आणि अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण आणि त्यांचे रक्त मास मेजवानी म्हणून मोठ्या थाटात पाहुणचार केला जातो.

या क्रूर कृत्य करणाऱ्या जेफ्री पेस्टिंग नावाच्या राक्षसाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावल्याचे पुरावे सापडले आहेत.

अशा वाईट क्रूर कृत्य असणाऱ्या मेजवानी मध्ये नरेंद्र मोदी आहेत या अशा क्रूर इपेस्टिंग फाईल मध्ये अडकवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल करीत आहे नाचवत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प या चर्चा बंद करण्यासाठी सध्याचे चालू असलेले युद्ध घडून आणले आहे, क्रूर जेफ्री एटेस्टिंग नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा मारेकरी ठरला आहे, पंतप्रधान मोदी यांनी खरोखर रामाचे भक्त असाल हिंदुत्ववादी असाल तर राजीनामा द्यावा, असे प्रदेश प्रवक्ते अरूण आबा जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भैलुमे, आप्पा सरोदे, तुकाराम पवार, गोदड समुद्र, यांची यावेळी भाषणे झाली, युवा आघाडी तालुका अध्यक्ष दत्ता भालेराव,जिल्हा महासचिव संजय शेलार, तुकाराम पवार, जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, जेष्ट सल्लागार दिलीप हिरभगत,कर्जत शहर अध्यक्ष विकास समुद्र, प्रदीप समुद्र, मनोज हिरभगत, रवि सोनवणे, हरीण पोटरे, भाऊ पोटरे,रंगीशा काळे, नुरा भोसले,काजोरी पवार, जुकी भोसले , यांच्या सह अनेक पदाधिकारी भीमसैनिक उपस्थित होते.


आंदोलनाचे आयोजन नियोजन तसेच उपस्थित सर्वांचे आभार तालुकाध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केले होते , तर कर्जत शहराध्यक्ष विकास समुद्र यांनी संपन्न झालेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!