पिंपरीत लॉज आणि बारवर पोलिसांचे छापे, 200 हून अधिक तरुण-तरुणी ताब्यात

0
233
जामखेड न्युज – – – 
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी रात्री बार आणि लॉजवर छापेमारी केली. जगताप डेअरी परिसरातील अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी 200 हून अधिक तरुण-तरुणींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं.
लॉज-बारमध्ये काय सुरु होतं?
  कोव्हिडसंबंधी नियमांचे उल्लंघन करुन अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि  एटीन डिग्री रुफ टॉप बार सुरु होते. दारु पिऊन आणि इतर मादक पदार्थांचं सेवन करुन तरुण-तरुणी वीकेण्ड पार्टी साजरी करत होते. अॅलो गॅस्ट्रो लॉजमधून 113, तर एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारमधून 105 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.
कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर नियमावली
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. या नियमांचं हॉटेल चालकांकडून पालन होतं आहे की नाही, हे पाहण्यासाठी पथकं स्थापन करण्यात आली होती. ही पथकं हॉटेलची तपासणी करुन यामध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करतात.
मुंबईत डान्सबारवर कारवाई
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या डान्स बारवर मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षअखेरीस धाड टाकली होती. त्यावेळी पोलिसांनी 15 ग्राहकांसह 20 जणांना अटक केली होती. गोरेगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी या बारमधील तळ घरातून 11 मुलींची सुटका करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here