घराचा ताबा मिळवून देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण – लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

0
216
जामखेड न्युज – – – 
 पालम प्रतिनिध  (गजानन काळे) 
    स्वतःच्या मालिकेचे घर राहण्यासाठी दिले असता त्यांनी काही अधिकारी व पदाधिकारी यांना हाताशी धरून घरात ताबा मिळवला आहे. माझे घर मला मिळावे म्हणून तुकाराम भिमराव सुरनर तहसिल कार्यालयासमोर हे कुटुंबासमवेत आमरण उपोषणाला बसले होते घराचा ताबा आठ दिवसांत देण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
      पालम तालुक्यातील तावजीवाडी येथील तुकाराम भिमराव सुरनर यांनी सहकुटुंब पालम तहसील कार्यालयासमोर दिनाक 14 ऑगस्ट पासुन बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी गिरीधरवाडी येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराची तक्रार करीत आपल्या मालकीच्या घराचा ताबा मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.पालम तालुक्यातील तावजीवाडी येथील भाऊसाहेब सखाराम सुरनर यांचे घर पडले होते.म्हणून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी तुकाराम सुरनर यांनी स्वतःचे घर दिले.हे घर परस्पर ग्रामसेवक आणि सरपंच यानी सगनमत करून  भाऊसाहेब सुरनर यांच्या नावावर करीत आहेत. ग्रामसेवकांनी मागील दोन महिन्यात नमुना नंबर 8 अ चा उतारा दोन वेळा
बदलला.शिवाय,मूळ नमुना नंबर 8 च्या रजिस्टरला खाडाखोड करून भाऊसाहेब सुरनर यांचे नाव टाकले. त्यासाठी पूर्वसूचना व सहमती न घेता ग्रामसेवक व सरपंच यांनी मनमानी कारभार केला. वास्तविक तीन वर्षांची घरपट्टी देखील तुकाराम सुरनर यांनी भरलेली आहे. याची तक्रार पालम पोलिस ठाण्यासह तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केली तरीही त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. आता माझ्या घराचा ताबा मिळवून द्यावा,संबंधित दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी उपोषणकरते तुकाराम सुरनर यांनी केली आहे. त्याचे निवेदन देखील सुरनर यांनी पालम तहसीलदारांना सादर केले आहे
*लेखीपत्र दिल्याने उपोषण सात तासा नतंर मागे*
सकाळी 9 वाजता उपोषण तहसिल कार्यालया समोर बसले होते याची दखल पालम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. व्ही. चकोर यानी घेऊन त्यांचे प्रतिनिधी विस्तार अधिकारी आर. के. गायकवाड ग्रामसेवक एस. के. गिते यानी गटविकास अधिकारी चकोर  याच्या स्वाक्षरी चे पत्र देण्यात आले व आठ दिवसात निर्णय घेण्यात येईल असे पत्र दिल्याने तांवजीवाडी येथिल तुकाराम भीमराव सुरनर यांनी उपोषण मागे घेतल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here