अशोक नाईकवाडे यांची परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदाला गवसणी
साकत, पाटोदा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
कडभनवाडी (साकत )गावचे भूमिपुत्र व सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंबळी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे कार्यरत असलेले शिक्षक अशोक नाईकवाडे यांनी विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेमध्ये मोठे यश मिळवले असून ते बीड जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत गावाचे नाव उंचावले आहे.
अशोक नाईकवाडे हे राज्य गुणवत्ता यादीमध्ये 37 व्या क्रमांकावर आहेत. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
नाईकवाडे यांचा नोकरीचा आरंभ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे झाला.या ठिकाणी सात वर्षे सेवा केल्यानंतर बीड जिल्ह्यातील धारूर येथे बदली झाली. त्या ठिकाणी ही आठ वर्षे सेवा करण्यात आली. त्यानंतर गणित विज्ञान शिक्षक म्हणून पदोन्नती ने पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे बदली झाली असून सध्या ते चुंबळी येथे कार्यरत आहेत.
अशोक नाईकवाडे यांचे प्राथमिक शिक्षण चौथी पर्यंत कडभनवाडी पाचवी ते दहावी श्री साकेश्वर विद्यालय साकत अकरावी बारावी नागेश ज्युनियर काॅलेज मध्ये झाले. विद्यार्थी दशेपासून शांत, संयमी म्हणून ते परिचित होते.
एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आता परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख झाले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर अशोक नाईकवाडे यांची यश मिळवले आहे. हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणा विषयी नव्या उत्साहाची भावना निर्माण झाली आहे.
त्यांच्या यशाबद्दल त्यांचे वर्गमित्र तसेच शालेय जीवनातील सवंगडी अरुण मुरूमकर,नवनाथ बहिर,विकास भोरे , निलेश मोहिते, करुण गायकवाड यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.