जामखेड न्युज ——-
योगिता मुकुंद नेमाने ची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड, साकत – पिंपळवाडी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी येथील मुकुंद नेमाने यांची मुलगी योगिता ची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड झाली आहे. तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परिसरातील अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

योगिता नेमाने हिचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी येथे तर पाचवी ते दहावी शिक्षण श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे झाले.

अकरावी बारावी ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेज मध्ये तर बीएस्सी पाटोदा जि. बीड येथे केली. वर्षभरापासून ती पोलीस दलात भरतीसाठी प्रयत्न करत होती.

नुकतेच ४५ दिवसांचे पासिंग आउट प्रशिक्षण सोलापूर गट क्रमांक १० मध्ये पूर्ण केले आहे. आता १७ तारखेला मुंबई येथे हजर होणार आहे.

महाराष्ट्र सुरक्षा बल ची कामे
सुरक्षा प्रदान करणे – महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या आस्थापना, कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, विमानतळ, मेट्रो स्टेशन आणि रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था राखणे.





