कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहीत पवार यांच्या प्रयत्नाने रस्त्यांसाठी दहा कोटी मंजूर
कर्जत जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तीन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात आ. रोहीत पवार यांनी मंजूर करून घेतले.
त्याचबरोबर जामखेड येथील तपनेश्वर गल्ली येथील हनुमान मंदीरासमोर सभामंडपासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर केला. त्यामुळे मतदार संघातील विकासाला चालना मिळाली आहे.
आ. रोहीत पवार यांनी विधानसभा अधिवेशनात जामखेड तालुक्यातील आनंदवाडी नायगाव देवदैठण, साकत कोल्हेवाडी रस्ता मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे साठी ३ कोटी रुपये,
शिऊर-नाहुली-देवदैठण-धामणगाव-तेलंगशी राज्यमार्ग रस्ता भाग धामणगाव ते तेलंगशी मजबुतीकरण व डंबरीकरण करणेसाठी ३ कोटी रूपये कर्जत तालुक्यातील राज्यमार्ग कोंभळी-कौंढाणे ते बिटकेवाडी सुधारणा करणेसाठी ४ कोटी रुपये निधी राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर केला आहे.
आ. रोहित पवार सत्तेच्या विरोधात असूनही आपला दबदबा कायम ठेवून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून घेतली आहे.
जामखेड शहरातील तपनेश्वर गल्लीतील हनुमान मंदिरास आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून नगरविकास खात्या मार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जामखेड शहरासाठी सोळा कामे मंजूर करण्यात आली असून यासाठी आडीच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
यामध्ये तपनेश्वर येथील हनुमान मंदिराला पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यातून सभामंडप उभारण्यात येणार आहे याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक राजेंद्र गोरे माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात सामाजिक कार्यकर्ते पाडुरंग माने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात युवक शहराध्यक्ष वसीम सय्यद शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण ढेपे नगरसेवक माजीद कुरेशी, संजय काशीद, मोहन पवार, ईस्साईल सय्यद, बिभीषण धनवडे, मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार कुकरेजा, उपाध्यक्ष बाळासाहेब वाघ, सचिव कल्याण घायाळ, सदस्य योगीता देशमुख, बंडू परदेशी, गणेश मासाळ, सेंच्युरीचे संचालक शिवाजी काळदाते सचिन देशमुख माजी सरपंच बाबासाहेब देशमाने उपस्थित होते.
रोहित पवार यांचे स्विय सहायक सचिन मोकाशी व सोमनाथ मैड, हरिभाऊ आजबे, मनोज भोरे, महारुद्र खैरे, हभप संतोष बारगजे, चितळे मामा, सचिन शिंदे, बजरंग डुचे, अनिल अडाले, समिर काझी, जगन्नाथ धर्माधिकारी, विजय क्षिरसागर, दिपक घायतडक आदी उपस्थित होते.