जामखेड न्युज—–
महिलांनी आपले हक्क व कायदे जाणून घ्यावेत – न्यायाधीश अनुश्री फंड
स्त्री असणे प्रश्न नाही, तो अभिमान – जयश्री देशमुख, ल. ना. होशिंग विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
स्त्री सशक्त झाली तर कुटुंब सशक्त झाले तर समाज सशक्त झाले तर राष्ट्र सशक्त होते असे प्रतिपादन जामखेड न्यायालयाच्या न्यायाधीश अनुश्री फंड यांनी केले.

आज दिनांक १० मार्च २०२६ रोजी शहरातील दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे ल.ना.होशिंग विद्यालयात तालुका विधी सेवा समिती जामखेड व वकील संघ जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्या जयश्री देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश अनुश्री फंड या उपस्थित होत्या.यावेळी आर.एस.पी.कॅडेट मुलींनी सामना सॅल्यूट करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली .

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँ साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,त्यागमुर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना गौरविण्यात आले.

पुढे बोलताना न्यायाधीश अनुश्री फंड म्हणाल्या की, भारतीय संविधानाने महिलांसाठी विशेष तरतुदी केल्या असून त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे करण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. महिलांनी आपले अधिकार आणि कायदे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कायद्याची माहिती झाल्यास स्वतःचे हक्क आणि समोरच्या व्यक्तीची जबाबदारी याची जाणीव होते व आयुष्य अधिक सुरक्षित आणि सुखकारक जगता येते.

आजची स्त्री ठरवले तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकते. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवले, तर सावित्रीबाई फुलेंमुळे महिलांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला. त्यामुळे संसार असो किंवा राजकारण, प्रत्येक क्षेत्रात महिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकते.


