Saturday, March 7, 2026
Home ताज्या बातम्या दोन्ही आमदारांना जे जमले नाही ते खासदार निलेश लंके यांनीच करून दाखवले...

दोन्ही आमदारांना जे जमले नाही ते खासदार निलेश लंके यांनीच करून दाखवले उपोषणाच्या इशाऱ्यामुळे अधिकारी जामखेड मध्ये हद्द निश्चिती करण्याचे केले मान्य हद्द निश्चिती व अतिक्रमण हटविण्याच्या च्या लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे

0
2

जामखेड, न्युज ——–

दोन्ही आमदारांना जे जमले नाही ते खासदार निलेश लंके यांनीच करून दाखवले उपोषणाच्या इशाऱ्यामुळे अधिकारी जामखेड मध्ये हद्द निश्चिती करण्याचे केले मान्य

हद्द निश्चिती व अतिक्रमण हटविण्याच्या च्या लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे

राष्ट्रीय महामार्ग कामाची अनियमितता व अतिक्रमणे याबाबत सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी उपोषण सुरु केले होते. काल शुक्रवारी जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आला होता. खासदार निलेश लंके यांनी काल उपोषण स्थळी भेट देत जाहीर पाठिंबा दर्शवला व जर आज अधिकारी जामखेड ला येऊन हद्द निश्चिती कामला सुरूवात केली नाही तर पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर खासदार निलेश लंके अमरण उपोषणाला बसण्याचे जाहीर करताच अधिकारी खडबडून जागे होत जामखेड ला धाव घेत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांनी एकत्र बैठक घेत हद्द निश्चिती करण्याच्या कामाला सुरुवात करू व २४ तारखेनंतर नगरपरिषद अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करेल असे पत्र दिले त्यामुळे साखळी उपोषण मागे घेतले. खासदार लंके यांच्या इशाऱ्यामुळे अधिकारी यांनी जामखेड मध्ये येत लेखी आश्वासन दिले आहे.

खासदार निलेश लंके म्हणाले होते की, जामखेड शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी अवधूत पवार सह सर्व पक्षीय नेते व ग्रामस्थांचे आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला होता आज आठवडे बाजार असल्याने सर्वाचे हित पाहता जामखेड बेमुदत बंद मागे घेत साखळी उपोषण सुरूच राहणार असे जाहीर केले होते. तसेच जामखेड च्या सर्व पक्षीय एकजुटीचा राज्याचे आदर्श घ्यावा असेही लंके यांनी सांगितले होते. व उपोषणाचा इशारा दिला होता.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी ची जामखेड नगरपरिषदेतील पंचदेवालय मंदीर, कोठारी पंप ते साकत फाटा पर्यंत हदद कायम होणे बाबत व त्याप्रमाणे रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे लेखी पत्र दिले आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे दोन दिवसांचे अमरण उपोषण व दहा दिवसांचे साखळी उपोषण मागे घेण्यात आले आहे.

आज दि. ०७/०३/२०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी कर्जत यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय जामखेड येथे झालेल्या बैठकीत नगरपरिषद हददीतील पंचदेवालय मंदीर, कोठारी पंप ते साकत फाटा पर्यंत भुमी अभिलेख विभागाने दिलेल्या राष्टीय महामार्गाच्या मालकीच्या जागेच्या हददीत राष्ट्रीय महामार्ग विभागाने काम करायचे आहे. तसेच या हददीतील अतिक्रमणे काढायचे काम राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी करणार आहेत.

या हददी पलीकडील भागात नगरपरिषदीने अतिक्रमण काढायचे आहेत असे ठरले. हदद कायम करावयाचे काम दि. २४/०३/२०२६ पुर्वी पुर्ण करायचे आहे. जेणे करून २४/०३/२०२६ तारखेनंतर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करता येईल व त्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचे चे उर्वरीत काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात येईल.

यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता संजय शेळके, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी शशिकांत सुतार, भुमी अभिलेखचे अनंत पाटील, नायब तहसीलदार प्रदिप पांडुळे, उपोषण कर्ते अवधूत पवार, शहाजी राळेभात, रंगनाथ राळेभात, राहुल उगले, मयूर डोके, अनिल सदाफुले, प्रदिप टाफरे, सुनील जगताप, विकास राळेभात, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, अमित चिंतामणी, पोपट राळेभात, नगरसेवक विकी घायतडक, अँड प्रविण सानप, पवन राळेभात, वसिम सय्यद, राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, प्रा. कैलास माने, प्रा. लक्ष्मण ढेपे, कुंडल राळेभात, अमोल गिरमे, बाबा चंदन, दत्ता सोले, यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
दोन्ही आमदारांना जे जमले नाही ते खासदार लंकेकी करून दाखवले – जामखेडकर

कर्जत जामखेड मतदारसंघाला दोन आमदार आहेत आमदार राम शिंदे व रोहित पवार यांनी जामखेड शहरातील ज्वलंत अतिक्रमण प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे जामखेड करांना धुळ, खाचखळगे व वाहतूक कोंडी चा सामना करावा लागत आहे. या अतिक्रमण हटाव अवधूत पवार यांच्या साखळी उपोषणात खासदार लंके यांनी उडी घेत अतिक्रमण संदर्भात अधिकारी यांची कान उघडणी करत उपोषणाचा इशारा देताच अधिकाऱ्यांची धावपळ उडाली व अधिकारी जामखेड मध्ये दाखल झाले व अवधूत पवार यांना हद्द निश्चितीचे लेखी पत्र दिले यामुळे पवार यांचे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले. जे दोन्ही आमदारांना जमले नाही ते खासदार निलेश लंके यांनी करून दाखवले अशीच जोरदार चर्चा जामखेड परिसरात सुरू आहे. यामुळे जामखेड करांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खासदार निलेश लंकेच खरे किंग मेकर ठरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!