Home ताज्या बातम्या जामखेड गोळीबारातील फरार मुख्य आरोपीला अटक स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड...

जामखेड गोळीबारातील फरार मुख्य आरोपीला अटक स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांची संयुक्त कारवाई

0
3

जामखेड न्युज—–

जामखेड गोळीबारातील फरार मुख्य आरोपीला अटक

स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांची संयुक्त कारवाई

 

जामखेड तालुक्यातील बहुचर्चित न्यु कावेरी हॉटेल येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय २४, रा. पाटोदा गरड, ता. जामखेड) हा जामखेड पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अक्षय मोरे हा जामखेड तालुक्यातल्या खर्डा परिसरात आला असता पोलिसांनी त्याला अटक केली.

दि ६ मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि जामखेड पोलीस यांच्या पथकाने खर्डा परिसरात कारवाई करत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सपोनि हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, समीर अभंग, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, हृदय घोडके, अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, रिचर्ड गायकवाड, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डिले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे, भगवान धुळे तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोउपनि किशोर गावडे, पुष्कर कडु, पोलीस अंमलदार प्रविण इंगळे, रविंद्र वाघ, देवीदास पळसे, कुलदीप घोळवे, दत्तात्रय बेल्हेकर, आकाश शेवाळे, प्रताप देवकाते, मनोज लातुरकर यांचे पथक तयार करुन त्यांना सदर आरोपीचा पुर्वइतिहास समजावुन सांगुन पथकास रवाना करण्यात आले.

फिर्यादी रोहीत अनिल पवार (वय २९, रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) हे न्यु कावेरी हॉटेलमध्ये असताना शुभम शहाराम लोखंडे, उल्हास विलास माने उर्फ वस्ताद, अक्षय उर्फ चिंग्या मोरे, अर्शद अमीन सय्यद व इतर ६ ते ७ साथीदारांनी गैरकायद्याचा जमाव करून पिस्तुलातून गोळीबार करून फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न केला हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून हॉटेलमधील साहित्य आणि फॉर्च्यूनर गाडीची सत्तूर व लाकडी दांड्याने तोडफोड करण्यात आली होती.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 669/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 कलम 109, 189(2), 191(2), 191(3), 190, 324(5), 351(2) (3) सह आर्म्स अँक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.गुन्हा घडल्यानंतर मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे हा फरार होता. दि 06 मार्च 2026 रोजी तो खर्डा परिसरात आल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग प्रविणचंद लोखंडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना कळविली.

यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि जामखेड पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथक तयार करण्याचे आदेश देण्यात आले पोनि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खर्डा गावच्या शिवारात तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अक्षय उर्फ चिंग्या मोरे याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने न्यु कावेरी हॉटेलवरील गोळीबार, फिर्यादीवरील जीवघेणा हल्ला तसेच हॉटेल आणि फॉर्च्यूनर गाडीची तोडफोड केल्याची कबुली दिली आहे.

अक्षय उर्फ चिंग्या मोरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही जामखेड पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, दंगल, दरोडा, खंडणी तसेच आर्म्स अँक्ट अंतर्गत असे मिळून 10 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपी अक्षय मोरेला पुढील तपासासाठी जामखेड पोलीस पोलीसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास करीत पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!