Saturday, February 28, 2026
Home ताज्या बातम्या ल. ना. होशिंग विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन उत्साहात...

ल. ना. होशिंग विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा शासनाच्या शाळा अंतर्गत बाह्य मूल्यमापनात ल. ना. होशिंग अ + श्रेणीत

0
2

जामखेड न्युज—–

ल. ना. होशिंग विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा

शासनाच्या शाळा अंतर्गत बाह्य मूल्यमापनात ल. ना. होशिंग अ + श्रेणीत

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त संस्थेच्या ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज वार शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिन आणि विज्ञान दिनानिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिव अरुणशेठ चिंतामणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी अजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्यासपीठावर कार्यक्रमासाठी माजी उपमुख्याध्यापक रमेश चांदेक, पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अरूण हेंद्रे, विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले , पर्यवेक्षक अनिल देडे , कार्यालयीन अधीक्षक ईश्वर कोळी तसेच अध्यापक- प्राध्यापक शिक्षकेतर, मोठ्या संख्येने पालक बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते .

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी, सी. व्ही. रमण तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत विज्ञान विभाग प्रमुख बबन राठोड यांनी केले. प्रास्ताविक मनोगतामध्ये त्यांनी विज्ञान व मराठी गौरव दिन साजरा करण्याचा उद्देश सांगून कविवर्य कुसुमाग्रज व महान शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या कार्याची माहिती सविस्तरपणे कथन केली.

ल ना होशिंग जुनियर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी पायल वायफळकर हिने विज्ञान मानवी जीवनाला कसे वरदान ठरले. विज्ञानाने फार मोठी सर्वच क्षेत्रात केलेल्या अफाट प्रगतीचे उदाहरणाच्या माध्यमातून माहिती सांगितली.

ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान विभाग विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती जी आर खके यांनी अतिशय अभ्यासपूर्ण शैलीत विज्ञान युगाचे महत्त्व सांगून सद्यस्थितीत आपण कसे जीवन जगावे. विज्ञानाने केलेली प्रगती व शोध यांचा मानवी कल्याणासाठी वापर करावा. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहून स्वतः यशस्वी व्हावे. संशोधनाचा कोणीही विघातक कार्यासाठी वापर करू नये असे आवाहन केले.

पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री हेद्रे साहेब यांनी संस्था व विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सर्व पालकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करून शाळेला शासनाच्या शाळा अंतर्गत बाह्य मूल्यमापनात मिळालेली अ + श्रेणी तसेच एन एम एम एस परीक्षेतचा उत्कृष्ट निकाल याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी उपस्थित ल ना होशिंग विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक व गणित- विज्ञान विषयाचे महान अध्यापक रमेश चांदेकर यांनी मराठी व विज्ञान दिनाचे महत्त्व सांगून विद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमाबद्दल व विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल सर्वांचे कौतुक केले व सर्वांना भविष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे साहेब यांनी विज्ञान व साहित्य याविषयी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी डोळसपणाने राहून आपले व्यक्तिमत्व विशाल बनवावे.

प्रचंड जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा. विज्ञान हा मानवी जीवनाचा पाया असून आपल्या पूर्वजांनी केलेले कार्य व लावलेले नवीन शोध त्यामुळेच आजचे वैभव आज आपण पाहत असून मराठीचे साहित्य अतिशय समृद्ध आहे. त्याचे सखोल वाचन व चिंतन करावे व आपले ध्येय पूर्ण करण्याचे आवाहन करून विद्यार्थी व उपस्थित पालक बंधू भगिनी यांच्याबरोबर त्यांनी खेळी मेळीच्या वातावरणात संवाद साधत वैज्ञानिक दृष्टिकोन व विज्ञानाचे नाविन्यपूर्ण विचार पटवून दिले.

विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी मराठी व विज्ञान दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमासाठी उपस्थित अतिथी व पालकांचे धन्यवाद व्यक्त करून विद्यार्थ्यांनी विज्ञान व साहित्य यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे प्रबोधन करण्यासाठी घेतलेल्या मेहनती बद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय श्री अरुणशेठ चिंतामणी यांनी सर्वांना मराठी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांनी विज्ञानातील नवविचार व मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेले साहित्य वाचावे व भाषेचा विकास घडवून आणण्याचे आवाहन केले.

यावेळी मराठी विज्ञान दिनावर आधारित विद्यार्थी व विद्यालयातील सहकारी अध्यापकांनी विविध गुणदर्शनाचा सुंदर व प्रभावी कार्यक्रम घडवून आणला व उपस्थितांची मने जिंकली
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील महिला अध्यापिका शिक्षिका प्रतिनिधी सुप्रिया घायतडक वंदना आल्हाट, संगीता दराडे, पूजा भालेराव , प्रियांका सुपेकर,स्वप्नाली घाडगे, रेश्मा कारंडे, प्रभा आखाडे, स्वाती हंगे,शितल जगदाळे स्वाती गिरी, मोहिनी जाधव तसेच अध्यापक किशोर कुलकर्णी, साईप्रसाद भोसले राघवेंद्र धनलगडे , प्रल्हाद साळुंखे, बापू जरे,धीरज पाटील, लक्ष्मण सोळंके, स्वप्निल जाधव, पंकज पोकळे, इत्यादी अध्यापक प्राध्यापक बंधू-भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी,एनसीसी विभागाचे विभाग प्रमुख पर्यवेक्षक अनिल देडे यांनी केले तर आभार समारंभ विभाग प्रमुख नरेंद्र डहाळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!