Tuesday, April 14, 2026
Home ताज्या बातम्या सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे लेहनेवाडी ते जामखेड शिवरस्त्याला मिळाला ग्रामीण...

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे लेहनेवाडी ते जामखेड शिवरस्त्याला मिळाला ग्रामीण दर्जा कांदा मार्केट साठी रस्ता उपयोगी – सभापती शरद कार्ले नगरपरिषद हद्दीतील हा मिनी बायपासच – नगराध्यक्षा प्राजंल अमित चिंतामणी

0
48

जामखेड न्युज—–

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे लेहनेवाडी ते जामखेड शिवरस्त्याला मिळाला ग्रामीण दर्जा

कांदा मार्केट साठी रस्ता उपयोगी – सभापती शरद कार्ले

नगरपरिषद हद्दीतील हा मिनी बायपासच – नगराध्यक्षा प्राजंल अमित चिंतामणी

जामखेड तालुक्यातील रा. म. मा. 548 ते जामखेड ते लेहनेवाडी या तीन किमी अंतराच्या रस्त्याला आता ग्रामीण रस्त्याचा दर्जा मिळाला आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. ना. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून हे मोठे काम मार्गी लागले आहे. यामुळे नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

या रस्त्यामुळे दळणवळण वाढणार असून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेणे आता सोईस्कर होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सभापती प्रा. ना राम शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.

लेहनेवाडी ते जामखेड हा रस्ता रस्ते विकास योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ना हरकत पत्र देखील प्राप्त झाले होते. सभापती प्रा. ना. राम शिंदे यांनी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले.

सभापती प्रा.ना. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे रस्ते विकास योजनेत या रस्त्याचा समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आता हा रस्ता विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या रस्त्यापासून जवळच कृषी उत्पन्न बाजार समितीचे 15 एकर क्षेत्र आहे.या ठिकाणी कांदा मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीमाल आणि कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दळणवळणाचा प्रश्न मिटणार असून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

चौकट

कांदा मार्केट साठी रस्ता उपयोगी – सभापती शरद कार्ले

लेहनेवाडी ते जामखेड रस्त्यालगत कृषी उत्पन्न बाजार समितीची 15 एकर जागा आहे त्या ठिकाणी कांदा मार्केट उभारण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे कांदा मार्केटला कांदा आणणे शेतकऱ्यांना सोपे होणार आहे.

शहराच्या बाहेरून हा मिनी बायपासच – प्राजंल अमित चिंतामणी

जामखेड शहराच्या बाहेरून हा रस्ता मिनी बायपास होणार आहे. यामुळे नगरपरिषद हद्दीतील लोकांना याचा फायदा होईल तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. विधान परिषदेचे सभापती प्रा. ना. राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!