जामखेड न्युज—–
प्रभाग सात मध्ये महिला आयोजित शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

महिलांच्या नेतृत्वात व उपस्थिती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रभाग सात मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली आहे गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होळकर निवासस्थान,स्वराज नगर,तपनेश्वर गल्ली,जामखेड या ठिकाणी शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सदर कार्यकाम प्रभाग सातच्या नगरसेविका नंदाताई प्रविण होळकर व महिला भगिनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जामखेड नगरपरिषद नगराध्यक्षा प्रांजलताई अमितशेठ चिंतामणी, योगिताताई पोपटनाना राळेभात, महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई संजयकाका काशिद यांची उपस्थिती लाभली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रजल्वन मान्यवर अतिथी व ज्येष्ठ महिला भगिनी यांच्या हस्ते करून सदर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित महिला भगिनी यांनी शिवपाळणा यांचे सादरीकरण करत शिव जन्मोत्सवाचे स्वागत केले.

भक्ती व शक्ती तसेच अध्यात्म व स्वराज्य या संगमाचे प्रतीक असणारा ऐतिहासिक प्रसंग अर्थातच जगदगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा जिवंत देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला.तसेच.ऐतिहासिक शिवगीतावर विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती उपस्थित महिला भगिनी यांच्या हस्ते करण्यात आली. पुष्पृष्टी करत महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच शिवगर्जनेच्या माध्यमातून राजांचा जयजयकार केला.

शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलू या विषयक माहिती पल्लवीताई सागर बाबर यांनी आपल्या प्रभावी मनोगत मधून सादर केली.महिलांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या सर्वांगसुंदर शिवजयंती कार्यक्रमास शुभेच्छा, नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, रोहिणीताई काशिद,योगिताताई राळेभात यांनी आपल्या मनोगत मधून दिल्या.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नगरसेविका नंदाताई प्रविण होळकर तर सूत्रसंचालन योगिताताई सचिन देशमुख यांनी केले.




