Thursday, March 5, 2026
Home ताज्या बातम्या सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड चा चेहरामोहरा बदलणार नगराध्यक्षा...

सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड चा चेहरामोहरा बदलणार नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी आयोजित हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

0
874

जामखेड न्युज——

सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड चा चेहरामोहरा बदलणार

नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी आयोजित हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

जामखेड च्या जनतेने सभापती प्रा राम शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षा सह पंधरा नगरसेवकांना निवडून दिले आहे. पाणी, रस्ते, वीज याचबरोबर विविध विकास कामे करत जामखेड चा चेहरा मोहरा बदलून जामखेड करांचा विश्वास सार्थ ठरविणार असा विश्वास सभापती प्रा राम शिंदे यांच्या सौभाग्यवती व जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांच्या वतीने जामखेड महाविद्यालय जामखेड येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. यावेळी माजी पंचायत समिती सभापती आशाताई शिंदे, नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, अमित चिंतामणी, पवन राळेभात, प्रा. विकी घायतडक, अँड प्रविण सानप, अर्जुन म्हेत्रे, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, सभापती वैशाली म्हेत्रे, जया गव्हाळे, नंदा होळकर, सीमा रवींद्र कुलकर्णी, आशाताई टकले, सुमन शेळके यांच्या सह सर्व नगरसेविका व अमित चिंतामणी मित्र मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बहारदार संगित मैफिलीने महिला मंत्रमुग्ध झाल्या याच बरोबर सर्व महिलांना संक्रांत वाण म्हणून सेंद्रिय गुळ व तिळगूळ वाटप करण्यात आले तसेच सर्वाची आल्पोहाराची सोय करण्यात आली होती.

प्रा. विजय साबळे यांच्या स्वर हिंदी मराठी गीतांचा बहारदार आँर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चिमुकल्यांनी मनमुराद नृत्याचा आनंद लुटला

 

यावेळी बोलताना आशाताई बोलताना म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीत आम्ही व कार्यकर्ते कमी पडलोत यामुळे निसटता पराभव झाला. पण शिंदे साहेबांचे काम पाहून विधानसभेचे सभापती पद दिले. यामुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली
त्यांच्या नेतृत्वाखाली जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले. जनतेने जो विश्वास टाकला आहे त्याला तडा जाऊ देणार नाहीत. आम्ही विकास करत चेहरा मोहरा बदलू असे सांगितले. 

अमित चिंतामणी नगरसेवक असताना आपला प्रभाग आदर्श केला तसे आता विकासाबाबत जामखेड शहर व वाड्या वस्तीचा विकास केला जाईल तसेच स्वच्छ सुंदर जामखेड केले जाईल असा विश्वास आशाताई शिंदे यांनी व्यक्त केला.

चौकट
प्रांजल अमित चिंतामणी नगरसेवक व नगराध्यक्षा पदीही उच्चांकी मताधिक्याने निवडून आल्या शासनानेही कायद्यात बदल करत दोन्ही पदांवर राहता येईल असा नियम केला.

चौकट
जामखेड महाविद्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमासाठी शहरासह वाडी वस्तीवरी महिलांची अलोट गर्दी लोटली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे तर आभार अमित चिंतामणी यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!