जामखेड नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा, आमदार रोहित पवारांना मोठा धक्का विजयाबद्दल काय म्हणाले सभापती प्रा राम शिंदे व नवनिर्वाचित नगराध्यक्ष पहा

0
844

जामखेड न्युज—–

जामखेड नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा, आमदार रोहित पवारांना मोठा धक्का

विजयाबद्दल काय म्हणाले सभापती प्रा राम शिंदे व नवनिर्वाचित नगराध्यक्ष पहा

 

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दणदणीत यश मिळालं आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाने १५ जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा आणि बहुजन वंचित आघाडीला २ जागा, तर शिवसेना शिंदे गट १ जागा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना १ जागा अशा विरोधकांना एकुण ९ जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

संपूर्ण निवडणूक प्रचारात दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या मात्र जामखेड करांनी भाजपाच्या बाजूंनी कौल दिला. या विजयी निकालानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत नगरपरिषद पासून भव्य मिरवणूक मेन पेठ ते शनि मंदिरापर्यंत आली यावेळी घोषणांनी जामखेड दुमदुमून गेले होते सभापती प्रा राम शिंदे व विजयी उमेदवारांनी जनतेचे आभार मानले.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांनी प्रत्येक प्रभागात जावून मतदारांचे आभार मानले. व नागरिकांनी त्यांचे औक्षण करून नगराध्यक्ष पदासाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

हा जनतेचा विजय आहे – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

 

यावेळी पत्रकारांशी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजलताई चिंतामणी म्हणाल्या की, हा माझा विजय नसून जामखेड करांचा विजय आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. या विजयात सभापती प्रा राम शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. यापुढे स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड करणार असल्याचा निर्धार नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी व्यक्त केला.

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टिकेला जनतेने मतदानातून उत्तर दिले : सभापती प्रा. राम शिंदे

यावेळी सभापती प्रा. राम शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. जामखेडच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. या निकालावर विरोधकांवरही निशाणा साधला आहे. विरोधकांनी, विशेषतः आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला जनतेनेच उत्तर दिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेवटी जनतेचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं असतं. भूमिपुत्र म्हणून जनतेने मला कौल दिला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त केला असून त्याचाही फायदा जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला झाला आहे. ज्या दिवशी विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशीच खऱ्या अर्थाने आम्ही विजयी झालो होतो.

एकूणच जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने सत्ता कायम ठेवत राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. अशा टोला आमदार रोहित पवार यांचे नांव न घेता सभापती राम शिंदे यांनी टोला लावला.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत नऊ उमेदवार उभे होते यात भाजपाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांनी 9754 मते घेत 3682 मतांनी विजयी झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here