ईव्हीएम मशीन मधील नंबर मध्ये तफावत, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी – पांडुरंग भोसले
प्रभाग क्रमांक ३ मध्ये कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबर मध्ये तफावत कशी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पांडुरंग भोसले यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच दुसरे अ चे पराभूत उमेदवार ऋषिकेश खरात यांनी ही मागणी केली आहे.
जामखेड – जामखेड नगरपरिषद मतमोजणीच्या वेळी शहरातील प्रभाग क्रमांक तीनचे केंद्र क्रमांक 2 चे मतदान मोजणी वेळी कंट्रोल युनिट नंबर मध्ये तफावत आढळून आली असून तक्रार करूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दाखल न घेता मतमोजणी करून निकाल जाहीर केला आहे याबाबत निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार सोनाली भोसले यांचे पती पांडुरंग भोसले यांनी केली आहे.
जामखेड नगर परिषदेच्या दि २ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक झाली होती त्यावेळी मतदानाच्या शेवटी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतपेटी सील करताना मतदानाचा हिशोब फार्म वर कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबर देण्यात आला होता.
दि 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतदान मोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधील केंद्र क्रमांक दोन चे मतमोजणी दरम्यान मतमोजणी मशीनवर कंट्रोल युनिट नंबर व सील पट्टी नंबर मध्ये तफावत आढळून आल्याने उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेऊन मतदान मोजणी थांबवून चौकशी करण्याची मागणी केली यावेळी मोठा गोंधळ उडाला होता.
त्यानंतर अपक्ष उमेदवार सोनाली पांडुरंग भोसले यांच्या प्रतिनिधींनी तक्रार अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता मात्र त्याची दखल न घेता कुणाच्यातरी दबावाला बळी पडून निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणाचेही म्हणणे ऐकून न घेता पुन्हा मतमोजणी करून निर्णय जाहीर केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका हि संशयास्पद असून मशीन मध्ये घोटाळा केला असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे तातडीने कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार सोनाली भोसले यांचे पती पांडुरंग भोसले यांनी केली आहे