कल्याण-लातूर हा नवीन महामार्ग साकत मांजरसुंभा मार्गे व्हावा – डॉ. भगवानराव मुरूमकर

0
1280

जामखेड न्युज—–

कल्याण-लातूर हा नवीन महामार्ग साकत मांजरसुंभा मार्गे व्हावा – डॉ. भगवानराव मुरूमकर

कल्याण-लातूर हा नवीन महामार्ग MSRDC करणार आहे तो मांजरसुंभ्याहुन पाटोदा- साकत- जामखेड-आष्टी ह्या सर्व भागातून अहिल्यानगर- कल्याण मार्गाकडे जोडला तर खुप फायदा होईल आपल्या जामखेड मतदारसंघातील गावांचा कायापालट होईल यामुळे हा रस्ता साकत मांजरसुंबा मार्गे व्हावा अशी मागणी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी केली आहे.

कल्याण-लातूर हा नवीन महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) बांधणार असून, तो माळशेज घाट, अहिल्यानगर, बीड मार्गे मांजरसुंभा आणि अंबाजोगाईहून लातूरकडे जाईल
असा प्रस्तावित असताना लातूर – कल्याण द्रुतगती महामार्ग हा धाराशिव जिल्ह्यातून की बीड जिल्ह्यातून यापैकी कोणत्या भागातून जाऊ शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तशी बीड व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांकडून आमच्याच जिल्ह्यातून जावा अशी मागणी होत आहे. तेव्हा हा मार्ग मांजरसुंभ्याहुन पाटोदा- साकत- जामखेड- आष्टी ह्या सर्व भागातून अहिल्यानगर- कल्याण मार्गाकडे जोडला तर खुप फायदा होईल असे सभापती डॉ भगवानराव मुरूमकर यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 442 किमी लांबीच्या लातूर – कल्याण या द्रुतगती (Expressway) मार्गाची घोषणा केली आहे. लातूर – कल्याण द्रुतगती मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनविण्याचे काम लवकरच सुरु होणार असून अंदाजित 35 हजार कोटी रु. खर्चून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या वतीने हा महामार्ग निर्माण केला जाणार आहे.

हा औद्योगिकरणासाठी आणि एकूणच कनेक्टिव्हिटीसाठी हा द्रुतगामी मार्ग नवसंजीवनी ठरणार आहे. या प्रकल्पाला जनकल्याण द्रुतगती मार्ग असे समर्पक नाव देण्यात आले आहे.

‘लातूर ते कल्याण महामार्गावरील वाहनांना पुढे कल्याण वरुन मुंबईला जाताना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागू नये यासाठी सदरील रस्त्यात किंचित बदल करून लातूर – अहिल्यानगर – माळशेज घाट मार्गे बदलापूर – वडोदरा एक्स्प्रेस वे वरील बोगद्यातून पनवेल जेएनपीटीला जोडण्यात यावे, जेणेकरून वाहनांना अटल सेतू किंवा मुंबई – गोवा द्रुतगती मार्गावरून मुंबईत जाता येईल.

मात्र महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून जाणार की बीड जिह्यातून जाणार अहिल्यानगर जिल्ह्यात जाणार हे स्पष्ट झालेलं नाही… जुन्याच मार्गाने गेल्यास हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून जातो तर नवीन dpr झाल्यास बीड जिल्ह्यातूनही जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. हा मार्ग साकत मांजरसुंभा मार्गे
बीड जिल्ह्यातून जावा अशी मागणी डॉ भगवानराव मुरूमकर यांनी केली आहे.

या मार्गाचे फायदे – प्रवासाचा वेळ कमी होईल, औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि मुंबई-लातूर कनेक्टिव्हिटी सुधारेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here