जामखेड-बीड रोडवरील हॉटेल कावेरी येथे गुरूवारी (१८ डिसेंबर) मध्यरात्री घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरून गेला. दहा ते अकरा जणांच्या संशयित टोळीने हॉटेलवर धडक देत प्रथम तोडफोड केली आणि नंतर अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार (वय २७, रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायात गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी रोहित अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून 669/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189 (2),|191(2), 191(3), 190, 324 (5), 351 ( 2 ) ( 3 ) सह भारतीय हत्यार| कायदा कलम 3, 25 प्रमाणे आरोपी 1)शुभम शहाराम लोखंडे रा आष्टी ता आष्टी जि बीड 2) बालाजी शिवाजी साप्ते रा. आष्टी जि. बीड 3 ) उल्हास विलास माने उर्फ वस्ताद रा. जांबवाडी रोड जामखेड ता जामखेड जि अहिल्यानगर या तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील उल्हास विलास माने उर्फ वस्ताद रा. जांबवाडी रोड जामखेड ता जामखेड जि अहिल्यानगर या आरोपीस आज न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने चार दिवसांची म्हणजे 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आज पोलिसांनी सापळा लावून अहिल्यानगर येथील नगर सोलापूर रोडवर श्याम हाॅटेल समोर उभे असलेले दोन आरोपी जामखेड पोलीसांची पकडले त्यांची नावे 1)शुभम शहाराम लोखंडे रा आष्टी ता आष्टी जि बीड 2) बालाजी शिवाजी साप्ते रा. आष्टी जि. बीड यांना पकडले यातील आरोपी एक कडे गावठी कट्टा व डीव्हीआर मिळाला आहे. नेमका हल्ला प्रकरणातील आहे की दुसरा याचा तपास पोलीस घेत आहेत.
तर 3 ) अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे रा भवरवाडी ता जामखेड जि अहिल्यानगर 4 ) अर्शद अमीन सय्यद रा. कडा ता आष्टी जि बीड व अनोळखी सहा ते सात इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे फरार आहेत.
दि. १८ रोजी बीड रोडवरील कावेरी हाॅटेल येथे रोहीत पवार हे मध्यरात्री उभे असताना १२ ते १२.१५ वाजता संशयितांची टोळी हॉटेलवर आली. आरोपींनी प्रथम हॉटेलातील टेबल, खुर्च्या, भांडी आणि इतर साहित्याची मोडतोड केली. त्यानंतर त्यांनी रोहीत पवार यांच्यावर थेट गोळीबार केला.
गोळी त्यांच्या पायाला लागली असून, मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाल्याने त्यांची परिस्थिती गंभीर आहे. हल्ल्यानंतर संशयितांनी रोहित यांची चारचाकी गाडी देखील फोडली, ज्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण हल्ला केवळ काही मिनिटांत घडला असून, कर्मचारी घाबरून पळून गेले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, आयपीसी कलम ३०७ (हत्या करण्याचा प्रयत्न), ३२७ (उसळीची तोडफोड) आणि महाराष्ट्र शस्त्र कायदा कलम ३(१)(२) अंतर्गत तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास केल्यावर चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. हा हल्ला जुना वाद आणि वैयक्तिक शत्रुत्व कारणीभूत असावे असा अंदाज आहे.
घटनास्थळी अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून, गावठी कट्ट्याचे (देशी पिस्तूल) अवशेष आणि टप्पर सापडली आहे. उर्वरित ५-६ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानींवरून तपास वेग घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे आणि जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी घटनास्थळाची सविस्तर पाहणी केली, फॉरेन्सिक पथकाला सूचना दिल्या आणि जखमींची भेट घेतली. पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली असून, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपासात प्राधान्य दिले आहे.या घटनेमुळे जामखेड-बीड रोड परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते. या प्रकरणातील तीन आरोपी पकडण्यात जामखेड पोलीसांना यश मिळाले आहे. बाकी आरोपींचा शोध सुरू आहे.