जामखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक, कमी भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड रिकव्हरी कमी म्हणून कारखान्याकडून ऊस घेण्यास नकार यामुळे शेतातील ऊसाला तुरे
जामखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक, कमी भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
रिकव्हरी कमी म्हणून कारखान्याकडून ऊस घेण्यास नकार यामुळे शेतातील ऊसाला तुरे
जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे. सध्या कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातील कारखानेजास्त भाव देत आहेत पण जामखेड तालुक्यातील कारखाना बारामती अँग्रो युनिट तीन म्हणजे जय श्रीराम कारखान्याकडून कमी भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सध्या परिसरातील साखर कारखाने 3100 रूपये तीन हजार शंभर रुपये भाव देतात पण बारामती अँग्रो जय श्रीराम हाळगाव 3000 ( तीन हजार रुपये देत आहे. तसेच रिकव्हरी कमी म्हणून 9805 जातीचा ऊस नेत नाहीत यामुळे शेतात ऊसाला तुरे फुटले आहेत. आणि या ऊसापेक्षाही कमी रिकव्हरी कमी असताना सुद्धा बाहेर तालुक्यातील ऊस घेतला जात आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना एक तर भाव कमी आणि यातच ऊस न घेतल्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात तसेच हळगाव परिसर, जवळा परिसर साकत परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी बारामती अँग्रो युनिट तीन जय श्रीराम हाळगाव येथील कारखाना घेतला शेतकरी आनंदात होते. पण कमी भाव व 9805 जातीचा ऊस रिकव्हरी कमी म्हणून नकार देणे यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. इतर कारखाने जेवढा भाव देतात तेवढा भाव व सर्व ऊस घ्यावा अशी मागणी होत आहे.
बारामती अँग्रो युनिट तीन म्हणजे जय श्रीराम ने गेल्या वर्षी 2850 रूपये भाव दिला होता तर अंबालिका 3000 हिरडगाव 3100 रूपये भाव दिला होता. असा भेदभाव का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
बारामती अँग्रो पण एक युनिट 3100 भाव दिला जात आहे तर जामखेड तालुक्यातील तीन नंबर युनिट श्रीराम हाळगाव ला 3000 भाव दिला जात आहे. तसेच रिकव्हरी कमी म्हणून 9805 जातीचा ऊस घेतला जात नाही तर 265 रिकव्हरी बसत नसताना त्यांच्या गटातून ऊस घेतात असा भेदभाव का❓ यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.
चौकट साकत परिसरात हजारो एकर ऊसाचे क्षेत्र आहेऊसाला तुरे फुटले आहेत. एक तर भाव कमी व9805 जातीचा ऊस घेतला जात नाही यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. इतर कारखाने देतात तेवढा भाव द्यावा तोडणीस आलेला सर्व ऊस घ्यावा अशी मागणी होत आहे.