सनराईज शैक्षणिक संकुलात ऐतिहासिक पुरातन नाण्यांचे प्रदर्शन
जामखेड पाडळी येथील सनराईज शैक्षणिक संकुलाच्या सनराईज इंग्लिश स्कूल,साहेबराव पाटील माध्य. व स्व. एम. ई. भोरे जुनिअर कॉलेज यांच्या वतीने आज बुधवार, दिनांक:१७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक व शैक्षणिक महत्त्व असलेल्या पुरातन नाण्यांच्या संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शना साठी प्रा. प्रदीप भोंडवे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या प्रदर्शनामध्ये विविध कालखंडातील व विविध देशांतील पुरातन काळातील काळी नाणी : भारताचे जुने नाणी ,यु एस. ए. चे डॉलर, यु.ए. ई. चे दिरहाम, नेपाळ चे रुपी असे विविध देशांची चलने( करन्सी) विद्यार्थ्यांच्या माहिती साठी मांडण्यात आले होते.
या प्रदर्शनातील सर्व नाण्यांचा संग्रह संस्थेचे संचालक प्रा.तेजस दादा भोरे यांनी केला होता, त्यांना लहानपणा पासूनच नाण्याच्या संग्रहाची आवडत होती. त्यांनी तो संग्रह विध्यार्थ्यांन समोर मांडला.
प्रत्येक नाण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यामागील कालखंड, त्या काळातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती याविषयी प्रा. प्रदीप भोंडवे यांनी अत्यंत सविस्तर माहिती दिली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहास केवळ पुस्तकात न राहता प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी मिळाली.
नाण्यांवरील चिन्हे, लेखन, धातू व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रश्न विचारत सखोल माहिती घेतली.या वेळी सनराईज शैक्षणिक संकुलाच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड- भोरे, संचालक प्रा.तेजस दादा भोरे, संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले, व असे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
इतिहास, संस्कृती आणि वारसा यांची ओळख करून देणारे हे पुरातन नाण्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरले.