Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शुभम घोडेस्वारची डी. एल. आय फायनलसाठी निवड...

जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शुभम घोडेस्वारची डी. एल. आय फायनलसाठी निवड साकतच्या खेळाडूची दिल्ली पर्यंत धडक

0
496

जामखेड न्युज——

जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शुभम घोडेस्वारची डी. एल. आय फायनलसाठी निवड

साकतच्या खेळाडूची दिल्ली पर्यंत धडक

जामखेड तालुक्यातील साकत येथील श्री साकेश्वर महाराजांच्या पावन भूमीत जन्मलेला शुभम जालिंदर घोडेस्वार हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पुढे आलेला एक उमदा टेनिस क्रिकेटपटू आहे.टेनिस क्रिकेट डी. एल. आय (ड्रीम लीग ऑफ इंडिया) स्पर्धेच्या प्रथम फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत त्याने आपली निवड पक्की केली असून, आता त्याची दिल्ली येथे होणाऱ्या फायनल सिलेक्शन राऊंडसाठी निवड झाली आहे.

शुभम हा खेळाडू घडवण्यात डॉ. सुशील तांबे सर यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. सततचे प्रशिक्षण, संयम आणि प्रोत्साहना मुळे साकत गावातून एक प्रतिभावान टेनिस क्रिकेटर जन्माला आला आहे.

याशिवाय कर्जत-जामखेडचे कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांचेही शुभमच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. पुण्यातील त्यांच्या ‘आर्यन क्रिकेट अकॅडमी’मध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी आमदार रोहित दादांनी उपलब्ध करून दिली.

याप्रशिक्षणामुळे शुभमचा आत्मविश्वास वाढला आणि त्याला दिल्लीतील डी. एल. आयफायनल सिलेक्शनमध्ये चमकण्याची संधी प्राप्त झाली.

रोहित दादांच्या सहकार्यामुळे खेडेगावातील मुलांनाही मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे, हे उल्लेखनीय आहे. आज शुभमने साकत गावाचे नाव दिल्ली पर्यंत उजळवले असून, संपूर्ण गावाच्या वतीने त्याला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चौकट
डीएलआय (DLI) म्हणजे ड्रीम लीग ऑफ इंडिया (Dream League of India), जी भारतामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजन करणारी एक प्रीमियर लीग आहे, जिथे युवा खेळाडूंना संधी मिळते; या लीगमध्ये मुंबई, दिल्लीसह अनेक ठिकाणांहून खेळाडू येतात आणि याचे सामने विविध शहरांमध्ये होतात, ज्यात खेळाडूंची निवड प्रक्रिया आणि ट्रायल स्पर्धा आयोजित केल्या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!