Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या आमदार सुरेश धस व आमदार रोहित पवार यांची जुगलबंदी कर्जत-जामखेडबाबत धस...

आमदार सुरेश धस व आमदार रोहित पवार यांची जुगलबंदी कर्जत-जामखेडबाबत धस यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा आक्षेप, धस यांची माघार

0
658

जामखेड न्युज——-

आमदार सुरेश धस व आमदार रोहित पवार यांची जुगलबंदी

  • कर्जत-जामखेडबाबत धस यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा आक्षेप, धस यांची माघार

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस व कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. धस यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्षेप घेत कर्जत जामखेड ही पवित्र भूमी आहे असे सांगितले.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (दि. ११) आमदार सुरेश धस व आमदार रोहित पवार यांच्यात जुगलबंदी रंगली. जमिनीच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान धस यांनी आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील एका हॉटेलवर कोणाच्या तरी मारामारी झाल्या, तरी माझे नाव घेतले जात असल्याचे सांगितले. धस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत रोहित पवार यांनी धस यांचे वक्तव्य कामकाजातून वगळण्याची मागणी केली. ती अध्यक्षांनी मान्य केली.

विधानसभा अधिवेशनात नगरपरिषद हद्दीतील आरक्षित जागेवर होणारी गुंठेवारी व झालेल्या मारामारीच्या घटनांबाबत बोलताना धस यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे उदाहरण दिले. त्यावेळी त्यांच्याकडून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले.

त्यावर रोहित पवार यांनी आक्षेप घेतला. पवार म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी, संत गितेबाबा, संत सीताराम बाबा यांची कर्मभूमी असलेल्या माझ्या मतदारसंघाबाबत धस बोलले, ते अयोग्य आहे. तुम्हाला उदाहरण द्यायचे असेल, तर काल्पनिक कुठलेही द्या, पण कर्जत-जामखेडचे नाव घेऊ नका.

हे अयोग्य आहे. माझ्या मतदार संघाबाबत ते जे काही बोलले, ते कामकाजातून डिलीट करण्याची विनंती त्यांनी केली.

त्यावर धस यांनीही माझे शब्द मागे घेतो, असे म्हणून पुढील वाद टाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!