Thursday, February 12, 2026
Home राजकारण प्रभाग नऊ साठी तात्याराम पोकळे व अर्जुन म्हेत्रे यांना प्रभागातील जनतेचा एकमुखी...

प्रभाग नऊ साठी तात्याराम पोकळे व अर्जुन म्हेत्रे यांना प्रभागातील जनतेचा एकमुखी पाठिंबा

0
703

जामखेड न्युज—–

प्रभाग नऊ साठी तात्याराम पोकळे व अर्जुन म्हेत्रे यांना प्रभागातील जनतेचा एकमुखी पाठिंबा

जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. विठाई मंगल कार्यालय येथे झालेल्या भव्य बैठकीत प्रभागातील अनेक कार्यकर्ते, युवक नागरिक, पदाधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत एकमताने तात्याराम (आबा) पोकळे व अर्जुन (दादा) म्हेत्रे यांना “फिक्स नगरसेवक” म्हणून सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला. व आबा दादा च्या नावाचा जयघोष केला.

जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठी भाजपतर्फे विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक तात्याराम (आबा) पोकळे व अर्जुन (दादा) म्हेत्रे यांनी निवडणुकीसाठी उभे राहावे सर्व प्रभागातील जनता आपल्या बरोबर राहिल असे सांगितले यावेळी म्हेत्रे वस्ती, पोकळे वस्ती, सदाफुले वस्ती, फुलमळा, टेकाळेवस्ती उत्तर भाग, वडाची वस्ती, खडकवाडी, काटकर वस्ती, कर्जत रोड व नगररोडचा नवीन भाग या ठिकाणचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना बहुसंख्य नागरिकांनी सांगितले की, काम करणाऱ्या माणसाबरोबर राहा, आपला तो आपलाच असतो आबा व दादा नगरसेवक म्हणजे आपण सर्वच नगरसेवक राहणार आहोत. सर्वात जास्त मताधिक्याने निवडून देऊन आपण एक इतिहास घडवू असे सांगितले. या दोघांनाही भाजपाकडून तिकीट नक्कीच मिळणार आहे. आपण त्यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ असे सांगितले.

 

यावेळी बोलताना तात्याराम (आबा) पोकळे म्हणाले की, प्रभागातील जनतेने एकमुखी पाठिंबा दिला याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानतो तसेच प्रभागातील अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही तत्परतेने प्रयत्न करू रस्ते, लाइट, पाणी, गटारे अशा असणाऱ्या अडचणी सोडवू अहोरात्र आपल्या सेवेत राहू

 

यावेळी बोलताना अर्जुन (दादा) म्हेत्रे म्हणाले की, तीन तारखेला माझ्या उमेदवारी साठी सर्व प्रभागातील लोक असेच जमले होते. आज तात्याराम आबा पोकळे यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या सर्व नागरिकांचे आभार आम्ही दोघे मिळून तुमच्या अडीअडचणी सोडविणार आहोत.

प्रभाग नऊ हा सर्वात सर्वात मोठे कार्यक्षेत्र असणारा प्रभाग आहे. तरीही सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अडचणी सोडविणार आहोत. सत्ता भाजपाचीच येणार आहे व आपल्या समस्या आम्ही सोडविणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!