तीन महिन्यांपासून फरार आरोपी जामखेड पोलीसांनी सापळा लावून पकडले
तीन महिन्यांपुर्वी जामखेड तालुक्यातील नान्नज येथेझालेल्या मारहाणीच्या घटनेतील फरार असेलेले आरोपी अखेर पोलीसांनी सापळा लावून आज पकडले आहेत.
दिनांक 24.08.2025 रोजी नान्नज ता. जामखेड येथे घडलेलल्या घटनेबाबत जामखेड पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे अभिजीत संपत साळवे वय 22 वर्ष धंदा शिक्षण रा. नान्नज ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकुर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन हातात घातक हत्यारे घेवुन एकत्र येवुन संगणमत करून प्रथम साईनाथ पान टपरी बाजारतळ नान्नज ता. जामखेड येथे येवुन फिर्यादी व साक्षीदार यांना फिर्यादीच्या गाडीला गाडी अडवी लावून त्यांना गाडीच्या बाहेर काढून त्यांना म्हटलं की. आमची दहशत संपवीत आहे काय तसंच गांवबंद करून भाषणे करुन आमची दहशत संपवितो काय
फिर्यादी व सक्षीदार यांना घातक हत्यार यांनी वार करुन आरोपी
1) सार्थक विजय साबळे 2) ओम चंद्रकांत गोरे 3) सोमनाथ काशीनाथ शिंगेटे सर्व रा. नान्नज ता. जामखेड हे घटने पासुन फरार होते.
सदर फियांद दिनांक 25/8/2025 रोजी सायंकाळी 16/29 वा जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा नोंद गु.र.नं. 481/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 109 (1) 118 (1).118(2).119 (2), 324(4),189(2),119 (2).191 (3).190.351 (2).126 ( 2 ) सह शघ्र अधि. सन 1959फलम 4/25 सह अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे सुधारणा अधिनियम सन 2015 चे कलम3(2)(V).3(2)(va) याप्रमाणे दाखल केली आहे.सदर गुन्हयात यापूर्वी सहा आरोपी अटक केली होते.
उर्वरीत आरोपी गुन्हा घडल्यापासुन फरार होते. आरोपीताना अटक करावीया करीता दलित संघटनांनी आंदोलन केली होती ओरोपीच्या शोध कामी DYSP श्री प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत विभागतुन तीन पथक नेमलेली होती काल दिनांक 02/11/2025 रोजी श्री DYSP प्रविण लोखंडे यांना गुप्त बातमी दाराकडुन मिळालेल्या माहितीवरून जामखेड पोलीसांनी व उपविभाग कर्जत येथील पोलीसांनी काष्टी ता. श्रीगोंद येथे सापळा लाऊन काल दिनांक 02/11/2025 रोजी आरोपी नामे
1) सार्थक विजय सावळं 2) ओम चंद्रकांत गोरे 3) सोमनाथ काशीनाथ शिंगे सर्वरा. नात्रज ता. जामखेड यांना काष्टी परीसरात पाठलाग करून पकडलं व अटक केली.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, वैभव कलबू अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, प्रविण लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शना खाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोसई किशोर गावडे पोसई कन्हेरे, पोहेकॉ गडकर, पोहेकॉ संजय लोखंडे, पोना रविंद्र वाघ, गणेश काळाणे, पोलीस काँन्स्टेबल देवीदास पळसे, कुलदीप घोळवे, प्रकाश जाधव, देवकाते, आकाश शेवाळे यांनी केली आहे.