जामखेड तालुक्याच्या भुमीपुत्राची शासनाच्या पुणे जिल्हा परिषद लिगल पॅनलवर नेमणूक

0
593

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्याच्या भुमीपुत्राची शासनाच्या पुणे जिल्हा परिषद लिगल पॅनलवर नेमणूक

 

जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील ॲड. प्रवीण युवराज वीर यांची शासनाच्या पुणे जिल्हा परिषद लिगल पॅनलवर नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे तालुक्याच्या भुमीपुत्राची उतुंग भरारी सर्वासाठी एक आदर्श आहे.

देवदैठण गावाचे सुपुत्र ॲड. प्रवीण युवराज वीर यांची महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा परिषद येथे लिगल पॅनलवर नेमणूक झाल्याबद्दल तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राजगुरुनगर सहकारी बँक या तीन्ही प्रतिष्ठित संस्थांच्या लिगल पॅनलवर नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्जवल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा! देण्यात येत आहेत.

 

त्यांच्या मेहनती, प्रामाणिक वकिली कारकिर्दीचा हा सन्मान असून देवदैठण गावाचे नाव त्यांनी अभिमानाने उजळवले आहे ही देवदैठण नगरी साठी खुप अभिमानास्पद गोष्ट आहे.

त्यांना पुढील कार्यकाळात अधिक यश कीर्ती आणि उत्तम आरोग्य लाभो हीच देवदैठण ग्रामस्थांच्या ‌वतीने सदिच्छा देण्यात आली आहे.

कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी व कुलस्वामी आणि ग्रामदैवत श्री मार्तंड भैरव यांच्या आशीर्वादाने हे यश संपादन झाले आहे अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे.

अभिनंदन ॲड. प्रवीण युवराज वीर! यांचे सोशल मीडियावर ग्रामस्थ देवदैठणकर मित्र मंडळी नातेवाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here