जामखेड कर्जत रोडवर लक्झरी बस व ओमीनी कारची जोरदार धडक, चालक गंभीर जखमी
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या मुळे जखमीस वेळेवर उपचार
कर्जत रोडवरील झगडे पेट्रोल पंपा समोर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. एका लक्झरी बस आणि ओम्नी कार (क्रमांक MH 12 GR 7073) यांची समोरासमोर धडक होऊन ओम्नी कार रस्त्यावरील खड्ड्यात कोसळली.
या अपघातात चालक सौरभ कोथिंबीर (रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती भागवत कोल्हे, सौरभ काळे आणि गणेश मुरूमकर यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली. कोठारी यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सौरभ ला त्यांनी उचलून तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला हलविण्यात आले.
सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार योगेश दळवी, महादेव मिसाळ, दीपक बोराटे तसेच पोलीस नाईक प्रवीण इंगळे करीत आहेत. या कार्यात संजय सानप यांनीही कोठारींना सहकार्य केले.
ऑक्टोबर महिन्यात १५ अपघात झाले आहेत.
“सध्या रोडचे काम सुरू आहे. लोक रस्त्यावरच गाड्या आडव्या लावतात त्यामुळे ॲम्बुलन्स चालवणे कठीण जाते. डिव्हायडर मधील खड्ड्यां मुळेही अडचणी वाढतात. सर्वात वाईट म्हणजे पेशंट गंभीर अवस्थेत असताना कोणी मदतीला येत नाही. जमलेल्या लोकांनी त्यास गाडीत टाकण्यास मदत केली. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी