Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड भाजपा कार्यकारीणी मध्ये साकतला महत्त्वाची पदे

जामखेड भाजपा कार्यकारीणी मध्ये साकतला महत्त्वाची पदे

0
1047

जामखेड न्युज—–

जामखेड भाजपा कार्यकारीणी मध्ये साकतला महत्त्वाची पदे

  1. सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली

    भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी भाजपाची जम्बो कार्यकारीणी जाहीर केली आहे यात साकतच्या युवकांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. कायम निमंत्रित सदस्य, उपाध्यक्ष, सरचिटणीस व शिक्षक आघाडी प्रमुख अशी पदे देण्यात आली आहेत.

आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तालुक्यातील प्रत्येक गटवार विभागाला स्थान देण्यात आले आहे. याचा फायदा गट व गणात होणार आहे.

कायम निमंत्रित सदस्य म्हणून जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांची निवड करण्यात आली आहे. सध्या ते साकत गटात जिल्हा परिषद साठी भाजपाकडून इच्छूक उमेदवार आहेत.

भाजपा कार्यकारीणी मध्ये साकतचे माजी सरपंच व युवा नेते कांतीलाल (चंद्रकांत) लक्ष्मण वराट यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. ते सध्या साकत पंचायत समिती गणासाठी भाजपाकडून इच्छूक उमेदवार आहेत.

तर भाजपा तालुका सरचिटणीस म्हणून युवा नेते ईश्वर (आप्पासाहेब) दादासाहेब मुरूमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेही सध्या साकत पंचायत समिती गणासाठी भाजपाकडून इच्छूक उमेदवार आहेत.

साकत ( पिंपळवाडी) येथील युवा नेते दादासाहेब विष्णु मोहिते यांना शिक्षक आघाडी च्या प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. तेही सध्या साकत गणातून पंचायत समिती इच्छूक उमेदवार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!