वडिलांचे अपुर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी साकत गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविणार – ऋषिकेश पाटील

0
669

जामखेड न्युज—–

वडिलांचे अपुर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी साकत गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविणार – ऋषिकेश पाटील

 

साकतचे माजी सरपंच तसेच आमदार रोहित पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते हनुमंत पाटील यांचे अल्पशा आजाराने काही महिन्यांपूर्वी निधन झाले त्यांनी सतत पंधरा वर्षे साकत ग्रामपंचायत ताब्यात ठेवत विविध विकास कामे मार्गी लावले. सध्या त्यांच्या भावजयी मनिषा पाटील सरपंच म्हणून कार्यरत आहेत. हनुमंत पाटील यांची जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढवून तालुका पातळीवर काम करण्याची इच्छा होती त्यांचे अपुर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा मुलगा ऋषिकेश पाटील पंचायत समितीसाठी साकत गणातून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार असे त्यांनी सांगितले आहे.

आमदार रोहित पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून हनुमंत पाटील यांनी आपली ओळख निर्माण केली होती तोच जिव्हाळा त्यांच्या मुलांनी जपला आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने साकत गणातून इच्छूक आहेत.

आमदार रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीत साकत परिसरातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्यात सरपंच हनुमंत पाटील यांचा वाटा मोठा होता. साकत ग्रामपंचायत मधुन सुमारे १२५० मतांचे लीड आमदार रोहित पवार यांना दिले यात हनुमंत पाटील यांचा वाटा महत्त्वाचा होता. पाटील यांच्यावर खुपच विश्वास होता. आता तोच विश्वास मुलांनी जपला आहे. त्यामुळे जर दादांनी उमेदवारी दिली तर निवडणुक लढविणार असे ऋषिकेश पाटील यांनी सांगितले. शेवटी दादांचा निर्णय अंतिम असेल. 

हनुमंत पाटील यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता लोकांना दिलासा देत मदत केली. अनेकांना रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळवून दिले, गोरगरीबांना किराणा किट वाटप केले, गावात मास्क व आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटल्या अनेक गरजूंना बेड उपलब्ध करून दिले असे कितीतरी कामे मार्गी लावले आजही लोक आदराने त्यांचे नाव घेतात आता वडिलांचा वारसा समर्थपणे मुले चालवत आहेत.

साकत परिसरात विविध विकास कामे मार्गी लावले आहेत. आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली तीन मेगावॅट सौर उर्जा प्रकल्प उभारला यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळू लागली. रात्रीची वणवण थांबली. तसेच ३३ केव्ही सबस्टेशन उभे करून लाईटची अडचण दूर केली.

ग्रामपंचायत अंतर्गत कामे
गावात अंतर्गत रस्ते, ट्रान्सफॉर्मर, पेव्हिग ब्लॉक, पाणीपुरवठा योजना, भुमीगत गटार, रस्ते काँक्रीटीकरण, पानंद रस्ते, बस सेवा, शाळा डिजिटल करणे, दलित वस्ती विकास कामे, जिल्हा परिषद शाळा वाल कम्पाउंड, गावातील विठ्ठल मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून दिल्याने मंदिर परिसराचा विकास झाला आहे.

आमदार रोहित पवारांच्या प्रेरणेतून स्वखर्चाने गावाच्या दर्शनी भागात 71 फुट स्वराज्य ध्वज उभारला. आजही डौलाने फडकत आहे. वडिलांप्रमाणेच मुले व संपूर्ण पाटील कुटुंब जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वात पुढे असतात. जर आमदार रोहित (दादा) पवार यांनी साकत गणातून पंचायत समिती साठी उमेदवारी दिली तर लढविणार असे ऋषिकेश पाटील यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here